Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शेतरस्त्यांसाठी खा शरद पवार यांच्या नावाने योजना सुरू करण्याची राष्ट्रवादी ओबीसी सेलची मागणी..! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन..!
शेतरस्त्यांसाठी खा शरद पवार यांच्या नावाने योजना सुरू करण्याची राष्ट्रवादी ओबीसी सेलची मागणी..! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन..!
प्रतिनिधी रावेर: निंभोरा ग्रामीण भागातील शेती अंतर्गत रस्त्यांची वर्षानुवर्षे दयनीय अवस्था असून या साठी असलेल्या पाणंद व इतर योजनांमध्ये कमी कामे होतात.मात्र प्रत्येक गावात भेटशिवारातील जाणाऱ्या रस्त्यांसाठी खा.शरदचंद्र पवार रस्ते विकास योजना या नावाने नवी योजना सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेल रावेर तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी उपमुख्यमंत्री ना अजित पवार व ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.
महाराष्ट्रातील शेतशिवारात काळी कसदार जमीन असल्याने गावापासून ते शेतात जाणाऱ्या विविध शेतरस्ते खोल व चकऱ्या पडलेले असून अनेक ठिकाणी शेतात जायला नीट शेतरस्ते नाहीत चांगले रस्ते नसल्याने शेतमालाची वाहतूक करतांना भाजीपाला तसेच इतर शेतमालाची प्रतवारी खराब होते त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
त्यातच जळगाव जिल्ह्यात केळी वाहतुकीसाठी क्षेत्रास्त्यांची मोठी अडचण आहे अशा वेळी या सर्व शेतरस्त्यांची दुरुस्ती एकाच योजनेतून होण्यासाठी खा.शरदचंद्र शेतरस्ते विकास योजना सुरू करून प्रत्येक मतदारसंघात दरवर्षी काही प्रमाणात रस्ते केल्यास शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर होईल अशी मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी आपल्या निवेदनात केली.यावेळी सोबत राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष शशांक पाटील तसेच शेतकरी राहुल पाटील,विकास महाजन आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांनी शेतरस्त्याबाबत पाणंद योजना असल्याचे सांगत जळगावचे संपर्क मंत्री असल्याने याबाबत जळगाव दौऱ्यावर आल्यावर आपल्या भागातील रस्त्यांबाबत बोलू असे सांगितले तर ना हसन मुश्रीफ यांनी निवेदनाबाबत नक्की विचार करू असे सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा