Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक कायदे राज्यात लागू करा.. जामनेरला तालुका भाजपाची किसान मोर्चाद्वारे मागणी...



जामनेर (संजय सूर्यवंशी)दि.7 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषीविषयक दोन विधेयके मंजूर झालेले असून केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर व केंद्रीय राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी विधेयक लोकसभा व राज्यसभा मध्ये मांडून ते आवाजी मतदानाने मंजूर केले आहे .शेतकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून यामुळे शेतकरी बंधनमुक्त झालेला आहे. शेतकऱ्यांच्या पदरामध्ये त्यांच्या घामाचे पूर्ण दाम मिळणार आहे. परंतु ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासून केंद्र सरकारच्या व मागील भाजपा शासनाच्या काळातील निर्णय व विविध योजनांना स्थगिती देण्याचे काम सातत्याने सुरु आहे.

सदर विधेयक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून या विधेयकाने शेतकऱ्यांची दलालांपासून मुक्तता होणार आहे. याने शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सुद्धा लाभ मिळणार आहे. या विधेयकाने शेतकऱ्यांना एक देश एक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे . परंतु शेतकऱ्यांप्रती बेगडी प्रेम असेलेले राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सदर विधेयक महाराष्ट्र राज्यात लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रद्द करावा व राज्यात कृषी विधेयकाची अंमलबजावणी व्हावी.

या आशयाचे निवेदन जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे यांना किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने देण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाने काढलेली अधिसूचना प्रत जाळण्यात आली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, किसान मोर्चा अध्यक्ष बापू काळबैले पंचायत समिती सभापती सौ सुनंदा पाटील, दिलीप खोडपे, बाबुराव घोंगडे, समाधान पाटील, जितेंद्र पाटील,अनिस शेख ,डॉक्टर प्रशांत भोंडे,महेंद्र बाविस्कर बाबुराव हिवराळे ,रवींद्र झाल्टे, दीपक तायडे, संतोष बारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध