Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

शिक्षकांना गोपनीय अहवालाची प्रत मिळणार...



उस्मानाबाद जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक,मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख यांना गोपनीय अहवालाची एक झेराॅक्स प्रत प्रतिवर्षी द्यावी या न्याय मागणीसाठी 30 जून 2020 पासून तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रा.रोहिणी कुंभार मॅडम,विद्यमान शिक्षणाधिकारी रामलिंग काळे यांचे कडे प्रहार शिक्षक संघटनेचा सातत्याने पाठपुरावा चालू होता.

शिक्षणाधिकारी रामलिंग काळे यांनी ब-याच दिवसापासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली काढून आदेश निर्गमित केले.रामलिंग काळे हे अल्पावधितच एक कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी म्हणून नावारुपाला आले.शिक्षक हितासाठी सदैव तत्पर राहून कार्यालयीन वेळे व्यतिरिक्त वेळ देऊन कामकाज करतात;त्यामुळेच ते सर्व शिक्षक मान्य शिक्षणाधिकारी म्हणून ओळखले जात आहेत.

 गोपनीय अहवालावर प्रतिवेदन व पुनर्रविलोकन अधिका-याची सही झाले नंतर संबंधित कर्मचा-यांना सदरील गोपनीय अहवालाची छायाकिंत प्रत देण्यात यावी असे आदेश गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व यांना देण्यात आले आहेत त्यामुळे आता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी या लाभा पासून शिक्षक वंचित राहणार नाहीत व वेळच्या वेळी लाभ मिळून जातील यामुळे सर्व शिक्षकांमधून या आदेशाचे स्वागत होऊन आनंद व्यक्त होत आहे. 

याबद्दल प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ सावंत,जिल्हा समन्वयक दत्तात्रय पुरी,जिल्हा नेते संतुक कडमपल्ले,जिल्हा कार्याध्यक्ष विशाल अंधारे,सचिव दत्तात्रय राठोड, उपाध्यक्ष फिरोज शेख ,हनुमंत माने, जिल्हा कोषाध्यक्ष रघुनाथ दैन,प्रवक्ते धनंजय आंधळे, जिल्हा संघटक योगेश चाळक, परंडा तालुका अध्यक्ष विनोद सुरवसे,उपाध्यक्ष शहाजी झगडे यांनी  शिक्षणाधिकारी रामलिंग काळे यांचे अभिनंदन केले व कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध