Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवार्ड, पो.आयुक्त अंकुश शिंदे यांना जाहीर झाला ! ! !
अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवार्ड, पो.आयुक्त अंकुश शिंदे यांना जाहीर झाला ! ! !
सोलापूर : (राहूल शिंदे) दि.6 पोलिस आयुक्तपदी विराजमान असलेले पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत दिला जाणारा यंदाचा अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवार्ड जाहीर झाला आहे.
प्रशासकीय आणि पोलिस दलात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवार्ड दिला जातो.
अंकुश शिंदे हे गडचिरोली येथून बदली होऊन जुलै 2019 मध्ये सोलापूरला आले आहेत. यांनी सुरुवातीच्या काळात पूर्व भागातील अवैध ताडी विक्री व्यवसाय, हातभट्टी व्रिकी व तयार करणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई केली. शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी शांतता व सुव्यवस्था राखण्यात नियोजनबध्द कामकाज पाहिले. दरम्यान, चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठिवर शाबासकी देऊन प्रेरणा दिली तर अवैध व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्यांना तथा त्यात भागिदारी असलेल्यांना थेट घरचा रस्ताही दाखविला. दुसरीकडे गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या नगरसेवकांवरही कारवाई केली आहे.
त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवार्ड जाहीर केला.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सोलापूर शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत दिला जाणारा अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
अनेक सामाजिक संस्था, संघटनांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे कौतूकही केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा