Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिरपूर चे नेत्रतज्ञ विशाल चष्माघर चे मालक हिरालाल भदाणे यांनी दि.४ ऑक्टोबर 2020 या दिवशी दागिने आणि हुंड्याच्या लोभाने आणि विकृत मानसिकतेने माझ्या मुलींचा बळी घेतला दुर्दैवी पिता विलास पाटील
शिरपूर चे नेत्रतज्ञ विशाल चष्माघर चे मालक हिरालाल भदाणे यांनी दि.४ ऑक्टोबर 2020 या दिवशी दागिने आणि हुंड्याच्या लोभाने आणि विकृत मानसिकतेने माझ्या मुलींचा बळी घेतला दुर्दैवी पिता विलास पाटील
सुनेचा छळ आणि हुंडाबळी साठी कुप्रसिद्ध पुरोगामी महाराष्ट्राच्या सडक्या प्रवृत्तीने शेवट एका सुसंस्कृत,प्रेमळ ,आत्मनिर्भर लेकीचा प्राण हिरावून घेतला.मी विलास पाटील,एका सर्वसाधारण मराठी बापाने एकुलती लेक सपना पाटील चा विवाह रितीरिवाजाने शिरपूर चे नेत्रतज्ञ विशाल चष्माघर चे मालक हिरालाल भदाणे यांचा कनिष्ट मुलगा विशाल याच्याशी मोठ्या हौशीने लावला. माझी मुलगी जरी एका सरकारी बँकेची मोठी कर्मचारी होती तरी मला हुंडा हा काही टळला नाही.
अंगभर दागिने आणि हुंड्याची रक्कम यांची किंमत सूनेपेक्षा सासरच्या मंडळींना नेहमी जास्त मोलाची होती.
वैवाहिक जबाबदारी आणि आवाहनाला सामोरे जाण्यास असमर्थ व बेरोजगार नवऱ्यावर तिने कितीही प्रेम केले तरी सासू व सासऱ्याच्या हट्टंपुढे ते नेहमी कमीच पडायचं आणि त्यात भर म्हणजे जेठ आणि जेठानी.दोघानमध्ये जणू स्पर्धाच होती की कोण जास्त छळ करेल. लाडात वाढलेल्या बेजबाबदार नवऱ्याला बॅचलर आणि वैवाहिक जीवन यात कधी फरक काळालाच नाही.
याच मानसिक आणि शारीरिक छळापोटी तिने 6 व्या महिन्यात मुलीला जन्म दिला. मोठ्या जिद्दीने तिने मुलीला जगवलं आणि सुधृड केल पण सासरच्या मंडळीनी तिचा छळ चालूच ठेवला. तिच्या कडून व माहेरून नेहमी पैशाची मागणी चालूच राहिली.
कालांतराने सासरच्या मंडळींची आणि नवऱ्याची मारझोड ,मानसिक छळ हे तिच्या रोजच्या जीवनाचा भाग बनला. कारण तिचा सोशिक स्वभाव आणि नवऱ्यावर व मुलीवर तिचे स्वतःपेक्षा जास्त प्रेम होते.
तिच्यावरील छळाचा कितीही प्रतिकार केला तरी तिच्या पदरी नेहमी नैराश्य आणि दुःखच आलं. दि.४ ऑक्टोबर 2020 ला सासरच्या मंडळींच्या लोभाने आणि विकृत मानसिकतेने माझ्या मुलींचा बळी घेतला.सध्या शिरपूर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला आहे.
परंतु सासरच्या मंडळींची सामाजिक,आर्थिक प्रतिष्ठा आणि पोलीस खात्याचा गलथान करभरापुढे माझ्या मुलीला न्याय मिळेल याची मला खात्री वाटत नाही.म्हणून आज मी या माध्यमातून तमाम मायबाप मराठी जनते पुढे मदतीची भीक मागतो आहे.
माझ्या मुलीला न्याय हवा आहे ...
आपला दुर्दैवी पिता
विलास पाटील
संपर्क९५९४२८१९५५
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा