Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ ऑक्टोबर, २०२०
बार्शी ग्रामीणचे पोलीस कॉन्स्टेबल, रामेश्वर मोहिते यांचे दुःखद निधन.....
उस्मानाबाद (राहूल शिंदे ) दि10 तालुक्यातील चिखली येथील रहिवाशी व सध्या.बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर मोहिते यांचे आज आपल्या शेतात काम करत असताना, विजेच्या धक्क्याने दु:खद निधन झाले.
रामेश्वर मोहिते त्यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने प्रचलित होते. 4 महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. रामेश्वर मोहिते यांच्या जाण्याने संपूर्ण चिखली गावावर शोककळा पसरली आहे. खा. ओमराजे निंबाळकर, आ.कैलास घाडगे-पाटील यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
त्यांची संघर्षमय कहानी थोडक्यात मांडली आहे संकल्पन अकॅडमीचे संचालक व मार्गदर्शक शिवाजी गाढवे यांनी,
लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेले त्यामुळे संघर्ष अटळ होता. शालेय जीवनामध्येच परिस्थितीचे चटके बसू लागल्याने दुपारी शाळा सुटल्यानंतर सायकलवर उस्मानाबादला येऊन बेकरीतून पाव विकत घेऊन रोज सकाळी शेजारील ईर्ला, दाऊतपुर या गावात विक्री करून दहावी पर्यंत शिक्षण घेतले.. पुढे पेट्रोल पंपावरती काम करत करत बारावी पास झाला.. संकल्पअकॅडमी वरती काम करून पोलीस भरतीची तयारी चालू केलीस आणि तेथेच आपली पहिली भेट झाली.. अकॅडमी वरती पडेल ती कामे तू करत होतास आणि मोकळ्या वेळेत तू सदैव अभ्यासात असायचा... अगदी अकॅडमी साफसफाईच्या कामापासून ते आईला शेतातील काम होत नाही म्हणून उस्मानाबादला मेस चालू करून घराला आर्थिक हातभार लावणारा तू.. उन असो की पाऊस असो दररोज सकाळी आणि सायंकाळी पाच वाजता खांद्यावरती गोळा घेऊन ग्राउंड वर नित्यनेमाने जाणारा तू.. या तुझ्या कष्टाला 2014 मध्ये फळ आले. तब्बल 193 गुण घेऊन तू संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून पहिला आलास... आणि तिथून तुझा सुखाचा प्रवास सुरू झाला... स्वतःच्या बहिणीला वडिलांची कधीही कमतरता भासू दिली नाहीस... तिचं इंजीनियरिंग पूर्ण करून स्पर्धा परीक्षेसाठी पुण्याला ठेवलेस... बार्शी वरून सतत गावाकडे येऊन आईची काळजी घेत होतास... मागील चार महिन्यांपूर्वीच तुझा विवाह झाला होता.... सर्वकाही सुरळीत चालू असताना अचानकपणे नियतीचे क्रूर खेळापुढे मात्र तू नतमस्तक झालास... आणि आम्हाला कायमचं सोडून गेलास. मागील सहा वर्षापासून दर शिक्षक दिनाला,गुरुपौर्णिमेला, आणि वाढदिवसाला रात्री बारा वाजता न चुकता मेसेज करणारा तू.. 2014 ला अकॅडमी चालू केल्यापासून ते आजपर्यंतचा सर्वोत्तम, सर्वगुणसंपन्न, चारित्र्यवान असा माझा आवडता विद्यार्थी होतास तू...
रामेश्वर तू कायम स्मरणात राहशील....
भावपूर्ण श्रध्दांजली ! ! !
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा