Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

देऊळगावकरांचे एक पाऊल, स्वच्छता की ओर ! ! !



परंडा (राहुल शिंदे) दि.2 तालुक्यातील देऊळगाव येथे, जि.प.प्राथमिक शाळेेतील विद्यार्थ्याच्या आग्रहास्तव व सचिन सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ स्वच्छतागृह बांधण्यासाठी पुढे येत आहेत.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शासन, प्रशासन स्वच्छतागृह बांधणीसाठी आग्रह धरतात परंतु ग्रामीण भागात आजही हवी तशी जागृती नाही.

हे अभियान सरकारने 100% निधी देऊनही यशस्वी होताना दिसत नाही. माञ लोकांनी ही चळवळ हातात घेतली तर आपण स्वच्छतागृह स्वखर्चाने करु शकतो.

राहण्यासाठी माडी, दारात मोठी गाडी, माडीत बघायला चांगला टिव्ही ,कॉम्प्युटर, कानाला भारी मोबाइल, पण दारात शौचालय नाही? ग्रामीण भागात हे चित्र मोठे आहे.

काही वर्षांपूर्वी सरकारने खेडोपाडी लोकांनी उघड्यावर प्रात:विधी उरकू नयेत, गावभर दुर्गंधी पसरू नये, रोगराईला आळा बसावा म्हणून पाणंदमुक्ती योजना आणली.

या योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून गरीब कुटुंबांना शौचालये बांधण्यासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली. अनुदान मिळत असल्यामुळे शौचालयांचे काम जोमाने सुरू झाले. लाभार्थींनी घराच्या एका कोप-यात ही व्यवस्था केली खरी; पण अनुदानाचे पैसे हातात पडताच शौचालयांचे रूपांतर आडगळीच्या खोलीत झाले.

मग सरकारने उपाय काढला. गावातील शिक्षक, ग्रामसेवक या मंडळींनी उघड्यावर प्रात:विधीस जाणा-या लोकांना फुले द्यावीत, असा फतवा काढला. या ‘गुड मॉर्निंग पथकां’नी सुरुवातीला काही दिवस अशी गांधीगिरी केली; पण लोक त्यालाही जुमानत नव्हते. त्यामुळे पथकांनी हार पत्करली.

स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी तरी महिलांच्या मानहानीचे चित्र आपल्याला बदलता आले असते. शेती-वाडी, माडी, गाडी आणि ट्रॅक्टरसारखी वाहने बाळगणारी मंडळी दहा-पंधरा हजार रुपये खर्चून शौचालयही बांधू शकत नसेल, यावर विश्वास बसणे अश्यक्य आहे.

बुरसटलेली मानसिकताच याला कारणीभूत आहे. केवळ दुर्गंधीच नव्हे, तर रोगराईलाही हीच मानसिकता कारणीभूत ठरत आहे. ग्रामीण भागात शुद्ध, निरोगी वातावरण, स्वच्छ हवा असावी, अशी शहरी मंडळींची अपेक्षा असेल; पण जोपर्यंत दुर्गंधीमुक्तीची चळवळ आकार घेत नाही, तोवर ती पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.

गाव हागणदारीमुक्त करण्याच्या दिशेने देऊळगाव कारणांनी उचललेले पाऊल खरोखरच कौतुकास्पद असेच आहे.इतर गावांनी देखील आदर्श घ्यावा असा स्थूत्य उपक्रम गावात राबवला जात आहे.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असल्याने स्वच्छ भारत मिशन साठी ही गावकऱ्या तर्फे खरी श्रद्धांजली असेल ! ! !

1 टिप्पणी:

प्रसिद्ध