Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०
‘तुमचे WhatsApp स्टेटस 30 पेक्षा जास्त लोक पाहतात का? जाणून घ्या सत्यता
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.30 अलीकडे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ होत चालली आहे. अनवधानाने आपण याची शिकार होऊ शकतात, यामुळे सायबर क्राईम कडून सातत्याने आवाहन करण्यात येत असते.
नुकतीच एक नवीन ट्रेंड व्हायरल झाला आहे. याबाबत आम्ही तुम्हाला अलर्ट करणार आहोत…. गेल्या काही दिवसांपासून व्हाट्सएपवर एक मेसेज सतत फॉरवर्ड होत आहे.
आपले व्हाट्सएप स्टेटस 30 पेक्षा अधिक लोक पाहतात का? असा प्रश्न या मेसेजमध्ये विचारलेला असतो आणि त्या मेसेजमध्ये एक लिंक असते.
ही लिंक आपल्याला व्हाट्सऍप स्टेटसला ठेवायची असते व त्याबदल्यात पैसे मिळतील असेही या मेसेजमध्ये सांगितलेले असते. या लिंकवर आपली व्यक्तिगत माहिती भरावी लागते. स्वतःचा मोबाईल नंबर, जिल्हा, इमेल आयडी अशी सर्व माहिती भरून घेतली जाते.
जर आपले स्टेटस 30 पेक्षा अधिक लोकांनी पाहिले तर आपल्याला 500 रुपये मिळतील असे सांगितले जाते. या आमिषाला बळी पडून बऱ्याच लोकांनी ही लिंक व्हाट्सएप स्टेटसला ठेवली व अनेकांनी त्यात माहितीही भरली. मात्र अजून कोणाला पैसे मिळाले नाहीत.
हे पैसे देण्यासाठी बँकेचे तसेच कार्डचे डिटेल्स मागितले जाऊ शकतात व हे कोणी सायबर गुन्हेगार करत असेल तर आपल्या खात्यातून पैसेही जाऊ शकतात
त्यामुळे याबाबत सतर्क राहण्याचा व आपल्या बँक अथवा डेबिट कार्डची कुठलीही माहिती कोणाला देऊ नका असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा