Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत मागण्यांचे निवेदनाची दखल घेऊन प्रश्नावर सविस्तर चर्चा..!




नंदुरबार प्रतिनिधी: दिनांक 10-11-2020 रोजी अंगणवाडी कर्मचारी यांची मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत चर्चा 
दिनांक 11-11-2020 रोजी विविध प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषदे समोर धरणे आंदोलन करण्यात येणार होते  मागण्यांचे निवेदनाची दखल घेऊन प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

1) 18 नोव्हेबर 2015 च्या शासन निर्णया नुसार अंडी ऐवजी त्या  (6)रु  किंमती प्रमाणे तेवढ्या किंमतीच्या आहार   समितीने निर्णय घेऊन आहार खरेदी करावा. 

2) अमृत आहार योजनेचे पेकिंग करून खाजगी वाहन भाड्याने करून त्यासाठी जे स्वतःचे पैसे खर्च केले आहेत़ ते पैसे ताबडतोब देण्यात यावे यांसाठी शासन स्थरावर पाठपुरावा केला जाणार आहे.

3) अमृत आहार शिजवण्याचे मानधन  लवकरात लवकर देणे बाबत शासनाचे मार्गदर्शन मागवले जाईल.
 
4) अमृत आहार योजनेचे ऑडीट करू नये या बाबत शिष्टमंडळाने तीव्र विरोध केला आहे तरी अंगणवाडी सेविकांना सूचित करण्यात येते कि अमृत आहार योजनेचे दफ्तर तपासणीसाठी जाऊ नये भविष्यात काही परिस्थिती निर्माण झाल्यास अंगणवाडी सेविका जबाबदार राहतील.

5)मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे देणे बाबत शासन निर्णय 21-7-2020 नुसार सेविकांनी मोबाईल दुरुस्ती केले आहेत़ या   2500 रु खर्च केले आहेत़ या बाबत प्रकल्प कार्यालयाला लेखी कळवावे.

6) कोरोना मुळे म्रुत्यु झालेल्या अंगणवाडी सेविकांच्या वारसाना विम्याची रक्कम देण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात येतील.

7) शासन निर्णयानुसार तात्काळ मे 2020 च्या रद्द केलेल्या सुट्या 31मार्च पर्यत देणे बाबत कार्यवाही करण्यात येत आहे. शिष्टमंडळाशी समाधान कारक चर्चा केल्याने जि.प. प्रशासनाने विनंती केल्याने उद्या. दिनांक 11-11-2020 चे धरणे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे.  कार्याध्यक्ष-युवराज बैसाने.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध