Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०
धुळे टोल प्लाझाच्या 144 युनियन कामगारांना न्यायालया कडून मिळाला दिलासा..!
धुळे टोल प्लाझाच्या मे इरकॉन सोमा प्रा.लि कंपनीवर कारवाई,144कामगारांना दिलासा
धुळे प्रतिनिधी:धुळे येथील टोल प्लझाच्या 144 कामगारांनी कामगार न्यायालयाकडे थकीत रक्कमा वसुलीसाठी दाखल केलेली याचिका कामगार न्यायालयाने मंजूर करून कामगारांची थक्कीत रक्कम 49लाख 89हजार 617 रु 15 दिवसांच्या आत कोर्टात भरणा करण्याचे आदेश मे इरकॉन सोमा प्रा.लि.कंपनीला दिले.
मे.इरकॉन सोमा प्रा.लि या कंपनीचे धुळे ते चांदवड असा 90किमीचा रस्ता चौपदरीकरणाचे काम बांधा,वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर पूर्ण करून त्यांचा टोल वसुलीसाठी नाका लळिंग येथे कार्यरत आहे.
टोल वसुलीचे काम कंपनीने दोन वर्षानी कंत्राटदार नेमणूक करीत असते व तसा करार केला जातो व त्या करारात ठेकेदाराचे कामगार कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी नमूद करण्यात येते.
मात्र ही बाब फक्त कागदोपत्रीच दाखवली जाते.टोलवरील अनेक कामगारांचे वेतन थकीत झाले होते.यासंदर्भात महाराष्ट्र विकास माथडी ट्रांसपोर्ट आणि जनरल कामगार संघटनेचे मार्गदर्शक राजा खंडेराव
देशमुख साहेब कार्यअध्यक्ष सुरेश मोरे, उपाअध्यक्ष सतोष भोई,नरेश हिरे,गणेश येलपले, तुषार शिंदे, योगेश गोसावी यांनी कामगार न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यामध्ये कामगारांचा व कंपनीचा पुरावा नोंदवण्यात आला.तसेच न्यायालयाने युक्तीवाद ऐकल्यानंतर कामगारांची याचिका मंजूर करीत कामगारांना 49लाख 89हजार 617 रूपये 12नोव्हेंबर 2020 पर्यंत जमा करण्याचे आदेश दिला आहे.
सदरची रक्कम कायद्याप्रमाणे प्रथम मूळ मालक म्हणून इस्कॉन सोमा कंपनीने भरावयाची आहे.त्यानंतर रक्कम ठेकेदाराकडून वसूल करण्याची मुभा कोर्टाकडून देण्यात आली आहे.याकामी कामगारांतर्फे अँड.सुभाष बी.पाटील यांनी काम पाहिले व त्यांना अँड.चैतन्य बरे यांनी मदत केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा