Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

बिहार व इतर पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या विजयाबद्दल जामनेरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष..!हर हर मोदी घर घर मोदी चा जयघोष..!



जामनेर प्रतिनिधी:संजय सूर्यवंशी जामनेर भारतीय जनता पार्टीच्या वतीने बिहार व इतर पोटनिवडणूक मध्ये झालेल्या विजयाबद्दल फटाक्यांची अतिषबाजी करत आपला आनंद साजरा केला.. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की आ.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. 

जणू दिवाळीच्या चार दिवस अगोदरच भाजपा कार्यकर्ते बिहारमधील विजयाबद्दल आपली दिवाळी साजरी करत आहे.बिहार मध्ये एन डी ए च्या माध्यमातून पूर्ण बहुमताने विजयी झाले .त्या मुळे बिहार तो एक झाकी है महाराष्ट्र अभी बाकी है . मोदी है तो मुमकिन है .अशा विविध घोषणा देत आपला आनंदोत्सव साजरा केला. 

यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर जा.ता.ए.सो. सचिव जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष अनिस शेख, श्रीराम महाजन, तालुका सरचिटणीस रवींद्र झाल्टे, नगरसेवक प्रशांत भोंडे, सुहास पाटील, सुधाकर माळी, महेंद्र बाविस्कर, कैलास नरवाडे, नाना वाणी, खलील भांजा व इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध