Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

रेल्वे प्रमाणे एसटी महामंडळानेही व्यवसायिकांना परवाना फी मध्ये दिलासा द्यावा..! एसटी बस स्थानक व्यवसायिकांची महामंडळाकडे मागणी‌..!



शेगाव:प्रतिनिधी उमेश राजगुरे याप्रमाणे रेल्वे विभागाने रेल्वे अंतर्गत व्यवसाय करणाऱ्यांना परवा नाभी व भाडे पट्ट्यात लोक डॉन कार्यकाळात सवलत दिली त्याच धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाने सुद्धा लॉकडाउन काळातील परवाना फी मध्ये सवलत देऊन दिलासा द्यावा अशी मागणी बस स्थानक व्यवसायिक धारकांनी ाज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली आहे. 

मार्च महिन्यापासून महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये याकरिता लोक डॉन लागलेले होते कार्यकाळात पाच  महिने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद होत्या त्यामुळे बस स्थानकावर सामसूम असून व्यवसाय ठप्प झाले होते मात्र असे असतानाही कोणतीही सवलत न देता राज्य परिवहन महामंडळाकडून नोटीस पाठवून बसस्थानकावरील दुकानदारांना किरकोळ विक्री करणाऱ्यांना नोटीस पाठवून मागील पाच महिन्यात परवाना वाढीव रक्कम भरण्याची सूचना केली आहे 

व्यवसाय ठप्प असल्याने अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या व्यवसायिकांनी समोर पैसे कसे भरावेत हा प्रश्न उभा ठाकला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या कॅन्टींग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्य परिवहन महामंडळ अधिकारी व राज्याचे परिवहन मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्यासोबत या संबंधित पत्रव्यवहार सुरू असून या महिन्याअखेर या प्रश्नाबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचे समजते त्यामुळे त्या बैठकीत जो निर्णय होईल तो आम्हा सर्वांना मान्य असेल असेही बस स्थानकावरील दुकानदारांनी जिल्हा विभागीय नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मंत्रिस्तरीय बैठकीपर्यंत पैसे भरण्याचा तगादा लावू नये असेही या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर प्रशांत खत्री  संजय कुमार स्वामी भारत खत्री  रामभाऊ गोरले भारत खोडके एम.एच.बानोत यांच्यासहे अनेक सदस्यांच्या सह्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध