Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

स्वच्छतेचे कंत्राट रद्द करण्यासाठी,काँग्रेस अनु.जाती विभागाचे आमरण उपोषण ! ! !




 रामदेवबाबा नगरातील विविध समस्यांचाही समावेश !!!

शेगाव शहर:(उमेश राजगुरे)दि.3 येथील स्वच्छता कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी तसेच सफाई कामगार व रामदेवबाबा नगर मधील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने २ नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाला शहराध्यक्ष भिकु सारवण यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली आहे.

रामदेव बाबा नगरातील व परिसरातील नागरिकांना बांधून देण्यात आलेल्या सदनिकांचे बांधकाम निकृष्ट असून सदनिकांची असलेले क्षेत्रफळ अगदी कमी आहे त्यामुळे वरच्या मजल्यावर त्यांना अजून एक हॉल बांधून देण्यात यावा तसेच पुनर्वसित झालेल्या भागातील नागरिकांचा सर्वे करून बेघर असलेल्या व एकाच घरातील कुटुंबांना सदनिका देण्यात यावी, पुनर्वसित लोकांना जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य करून त्यांना रोजगार मिळण्यासाठी न.प.ने मार्केटमध्ये छोटी-छोटी दुकाने सुद्धा बांधून देण्यात यावी,

रामदेव बाबा नगरातील नागरिकांसाठी भव्यदिव्य समाज मंदिराची इमारत बांधून परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे तसेच त्या ठिकाणी मुलांसाठी गार्डन वाचनालय व सामूहिक शौचालय बांधून देण्यात यावे, रामदेवबाबा नगरातील लोकांना बांधून देण्यात आलेल्या सदनिका स्वतःच्या नावे समाविष्ट करण्यात याव्या जेणेकरून बँकांकडून त्यांना कर्ज सुद्धा घेता येईल, शेगाव शहरातील विविध भागात बांधण्यात आलेल्या शौचालय व स्नानगृहाची अत्यंत दयनीय अवस्था आहे त्यामुळे शहराच्या आजूबाजूला घाण पसरली यातून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो तर स्वचतेचा ठेका ज्या कंपनीला दिला आहे त्या कंपनी मालकांनी स्वतःचे उद्योगधंदे उभारले त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे म्हणून सदर कंपनीचा ठेका रद्द करून नवीन ठेकेदार नेमण्यात यावा या मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण गवई, युवक शहराध्यक्ष पवन पचेरवाल, अशोक तायडे, संतोष सारवण, सोनू सारवण, गणेश छापरवाल, गणेश चांडले, बंडू कळस्कार, रामू सारवन, राहुल सारवन, अस्लम खान, यांच्यासह अनेकांचा सहभाग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध