Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०
डाॅ.राहुल कामडे यांची पी.एचडी संशोधनास सुरुवात..!
शिरपूर प्रतिनिधी:बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेद महाविद्यालयातील प्रा.डाॅ.राहुल कामडे यांनी नुकतीच पुणे येथील भारती विद्यापीठांतर्गत स्री-रोग आणि प्रसुतीतंत्र या विषयात पी.एचडी साठी संशोधनास सुरुवात केली आहे."आदिवासी भागातील नवप्रसुता मातांच्या आरोग्यासाठी सौभाग्य शुंठी पाक ग्रॅन्युल्सचा प्रभाव" या प्रकल्पावर संशोधन कार्य होणार आहे.
ग्रामीण व आदिवासी भागातील स्रियांना बरेचदा प्रसुती नंतर योग्य चिकित्सा न मिळाल्यामुळे माता व नवजात बालकाला अनेक गंभीर आजारांना बळी पडावे लागते. ही समस्या आयुर्वेदीक औषधांमुळे टाळता येऊ शकते. मातेतील रक्ताल्पता,दुधाची कमतरता,व बालकाचे कुपोषण यावर प्रभावी उपचार मिळू शकतो.
तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकेल.आदिवासी भागातील अनेक स्रिया आरोग्य रक्षणाच्या बाबतीत उपेक्षित आहेत.हा प्रकल्प दारोदारी आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्यास उपयुक्त ठरणार आहे.या समाजाभिमुख प्रकल्पाबाबत धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषारजी रंधे,सचिव निशांतजी रंधे,खजिनदार आशाताई रंधे,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुलजी रंधे,नगरसेवक रोहितजी रंधे,
प्राचार्य डाॅ.राजेश गिरी,निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ.दिलिप पाटील, तसेच आयुर्वेद महाविद्यालय, बोराडी च्या समस्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यानी अभिनंदन केले आहे.या उत्कृष्ट प्रकल्पाचे बोराडी परिसरात कौतुक केले जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा