Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०
म .रा.मराठी पत्रकार संघाची सभा उत्साहात संपन्न झाली...!
रावेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रावेर तालुका ची बैठक आज चिनावल येथे तालुकाध्यक्ष विलास ताठे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटन ध्येयधोरणे सभासद वाढवणे व संघातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी तालुका भरातील पत्रकार बंधु मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रावेर तालुक्यातील पत्रकार हा केवळ पत्रकार म्हणूनच कार्य करत नाही तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत असतो यावेळी पत्रकारावर होणारे अन्याय त्याचप्रमाणे समाजात होणारे अनुचित कार्य यास लगाम घालण्याचे कार्य करतो त्या अनुषंगाने रावेर तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे कार्य तसेच शेतकरी शेतमजूर नोकरदार या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल यानुसार पत्रकार संघाचे कार्य करावे व समाजात एक आदर्श निर्माण करावा असा यावेळी ठरवण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ताठे उपाध्यक्ष संतोष नवले कार्याध्यक्ष योगेश सैतवाल सचिव दिलीप भारंबे सहसचिव जगदीश चौधरी तालुका संघटक प्रदीप महाराज पंजाबी तालुका संघटक विनायक संजय जहुरे , सल्लागार सरदार तडवी सहसल्लागार श्री विनोद कोळी(शिवा भाई G) शहर अध्यक्ष ,संतोष बारी ,मनिष चव्हाण , अनिल मानकरे , योगेश पाटील ,प्रमोद कोडे , विनोद पाल्हे , सरजू होले ,संकेत पाटील , गिरीश नारखेडे ,हसन तडवी ,सुरेश पवार , गणेश भोई ,प्रा.दिलिप सोनवणे , हमीद तडवी हे हजर होते.
सदर वेळी प्रास्ताविक दिलिप भारंबे यांनी तर तालुका अध्यक्ष विलास ताठे यांनी मार्गदर्शन केले आभार प्रा.दिलिप सोनवणे यांनी मानले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा