Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावाजवळ भिषण अपघात..!
शिरपूर प्रतिनिधी:मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात घडला असून यात एकाच कुटुंबातील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात 1 वर्षीय मुलीसह 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.तर तिन जण जखमी झाले आहेत.
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वर आज दि 17 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भुसावळ येथून मुलीला भेटण्यासाठी कुटुंब रीक्षात ठिकरी ता.सेंधवा येथे मुलीच्या भेटीला जात असतांना शिरपूर जवळील हाडाखेड गावाजवळ भिषण अपघात घडला.रीक्षात जात असतांनाच मध्यप्रदेश कडे भरधाव वेगाने जाणारी आयशरने रीक्षाला मागून जोरदार धडक दिली.यात एकाच कुटुंबातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
भुसावळ येथील नारायण पवार हे कुटूंबासहीत मुलीला भेटण्यासाठी भुसावळ येथून अँपे रीक्षाने मध्यप्रदेश राज्यातील ठिकरी ता.शेंधवा येथे जात असतांना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड ता.शिरपूर गावाजवळ मध्यप्रदेश कडेच जाणाऱ्या एम.एच.18 एम.5510 या आयशर गाडीने अँपेला मागच्या बाजूने जोराची धडक दिली.
हा अपघात इतका भिषण होता की यात नारायण पवार यांची 1 वर्षाची नात तनिष्का नरेश पवार व प्रमिला नारायण पवार वय 60 यांचा जागिच मृत्यू झाला.तर सुन शितल नरेश पवार वय 24,नात वेदिका नरेश पवार वय 4 व चालक जितेंद्र नाना देशमुख हे जखमी झाले.घटनेची माहिती प्राप्त होताच रुग्णालयाने सर्वांना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा