Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

श्रद्धा भक्ती पूर्ण वातावरणात भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन..!मंदिर प्रशासनाच्या व्यवस्थेचे भाविकांनी केले कौतुक..!



शेगाव प्रतिनिधी: मागील सात ते आठ महिन्यापासून लाखो भाविकांची माऊली संतश्रेष्ठ शिरोमणी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आतुरलेली गोरगरीब जनता श्रींच्या दर्शनाने फार भारावून गेलेली दिसत होती आज मंगळवार 17 नोव्हेंबर रोजी श्री संत नगरी शेगाव शहरात श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार शेकडो भाविकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीत रांगेमध्ये उभे राहून तथा सोशल डिस्टंसिंग चे पूर्णपणे पालन करून श्रींच्या समाधी मंदिराचे व राम मंदिराचे दर्शन भक्ति भावपूर्ण वातावरणात घेतले मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व मंदिरात शेगाव येथील मंदिर सुद्धा कोरोना महामारी प्रादुर्भाव होऊ नये याकरिता दर्शनासाठी भाविक करिता बंद करण्यात आले होते.

दर्शनाची ओढ लागलेल्या भाविकांसाठी दीपावलीच्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक आनंदाची बातमी घोषित केली ती म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व मंदिरे 16 नोव्हेंबर पासून उघडणार शेगाव येथील प्रसिद्ध श्री संत गजानन महाराज मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे या उद्देशाने एक दिवस उशिरा म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी श्रींचे मंदिर भक्तांसाठी उघडे करण्यात आले श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे मंदिर प्रशासनाने इ दर्शन पास काढणे आवश्यक ठेवले आहे.

याबाबतची सूचना मंदिर प्रशासनाने दोन दिवस आधीच मंदिर प्रवेशद्वाराजवळच लावलेली होती त्यामुळे 16 नोव्हेंबर रोजी दर्शनाच्या आशेने शेगाव येथे आलेल्या भाविकांना सदर सूचना माहित होताच त्यांनी इ दर्शन पास काढून घेतल्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करता च तेथील ड्युटीवर कार्यरत सेवाधारी यांच्याकडून मिळालेल्या आपुलकीच्या वागणुकीमुळे भाविक समाधान झाले.

सोशल डिस्टंसिंग मंदिराची स्वच्छता आणि शिस्तबद्धता हे सर्व पाहून दर्शनासाठी आलेले भाविक व दर्शन घेऊन परत जाणारे भाविकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपला आनंद व्यक्त करत मंदिर प्रशासनाला धन्यवाद दिले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध