Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

सामुहिक बलात्कार करून विष पाजून तिला ठार मारल्या प्रकरणी आज राष्ट्रीय चर्मकार महासंघ शिरपूर तालुका तर्फे मा.तहसीलदार साहेब च यांना निवेदन देण्यात आले



शिरपूर प्ररतिनिधी: जळगाव जिल्हातील पारोळा ता‌लुक्यातील मौजे-टोळी येथील चर्मकार समाजाच्या अनुसूचीत जातीच्या २० वर्षीय तरुणीच अपहरण करून सामुहिक बलात्कार करून विष पाजून तिला ठार मारल्या प्रकरणी आज राष्ट्रीय चर्मकार महासंघ शिरपूर तालुका तर्फे मा.तहसीलदार साहेब च यांना निवेदन देण्यात आले. तसेच त्या नराधमांची केस फास्ट ट्रॅक कोर्टात करून त्यांना फाशी ची शिक्षा देण्यात यावी.व पीडित परिवाराचे स्थलांतर करून दुसऱ्या जागेवरती पुनर्वसन करण्यात यावे. 

अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व माजी समाज कल्याण मंत्री चर्मकार ह्रदयसम्राट मा. श्री. बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली करीत आहोत. तसेच आमचे म्हणणे,मा.पंतप्रधान, मा. महामहिम राष्ट्रपती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, व तत्सम अधिकारी यांच्यापर्यंत पोहचावी ही नम्र विनंती. निवेदन देतांना उपस्थित राट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश सदस्य:श्री  सुरेशभाऊ आहिरे तालुका अध्यक्ष:श्री संजय मोरे (सर) महिला प्रतिनिधि: ताईसाहेब सौ. कृणाली महेंद्र आहिरे   शहराध्यक्ष:-श्री अशोक रखमे युवा मंडळाचे अध्यक्ष:श्री विनोद (लालाभाई) हिरे कर्मचारी अध्यक्ष:संजय महाले( सर) श्री ईश्वर आहिरे श्री नरेंद्र महाले समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध