Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०
थकित वेतन मिळण्यासाठी एस.टी कामगार संघटनेकडून शेगाव तहसील येथे आंदोलन.
शेगांव (उमेश राजगुरे)दि.२ महाराष्ट्राची लोकवाहिनी ,जीवनवाहिनी म्हणून आपल्या सर्वांची लालपरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडली असून एस टी महामंडळ मधील कर्मचारी कोरोना सारखा भयंकर आजार चे प्रादुर्भाव असताना सुद्धा आपला जीव धोक्यात घालून कामगिरी बजावत आहेत.या परिस्थितीत माहे ऑगष्ट पासून आजपावेतो ३ महिन्याचे वेतन कामगारांना देण्यात आलेले नाही .
त्यामुळे कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आलेली आहे.एकमेव मान्यता प्राप्त एस टी कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस मा. हनुमंत ताटे साहेब , राज्य अध्यक्ष मा. संदीपदादा शिंदे यांचे निर्देशावरून संपूर्ण महाराष्ट्रात आज निवेदन मोहीम राबविण्यात आली .
या निवेदनात प्रामुख्याने पगार नियमित वेळेवर मिळण्यासोबतच कामगार करार नुसार राज्य शासन प्रमाणे महागाई भत्ता देण्याचे मान्य असल्याने या वाढीव महागाई भत्ता ची थकबाकी मिळावी .शासकीय कर्मचारी प्रमाणे सण उचल रक्कम १२,५००/- रु लागू करावी.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज निवेदन मोहीम राबविण्यात आली .यात मा. तहसीलदार शेगांव,यांना दिवाळी सण सुरू होण्यापूर्वी मागील तीन महिन्याचा थकीत पगार देण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले.व मागण्या मान्य न झाल्यास येत्या ९ नोव्हेंबर रोजी कुटुंबातील सदस्यांसह एस टी कामगार आक्रोश आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला.
यावेळी कामगार संघटनाच्या शिष्टमंडळाने आगार अध्यक्ष महेश बुरुंगले,आगार सचिव अमोल राठोड यांच्या नेतृत्वात जेष्ठ मोहन राहाटे, सुरेश फासे, महादेव नेरकर पंकज बोराखडे,शेषराव निंबाळकर,नागनाथ गवई,भास्कर गीते,गजानन गोसावी,प्रदीप आपोतिकर,दिलीप अरबट, शिवाजी दुबे,अमोल गावंडे,नरेंद्र खंडेराव इ.शेगांव आगारातील येथील बहुसंख्य कामगार बांधव यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा