Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन उपक्रम, शेगाव येथे आयोजित रक्तदान शिबिरात 51 जणांचे रक्तदान
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन उपक्रम, शेगाव येथे आयोजित रक्तदान शिबिरात 51 जणांचे रक्तदान
शेगाव (उमेश राजगुरे)दि.3 संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा शेगाव च्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन खामगाव रोड शेगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले यामध्ये 46 पुरुष व पाच महिला असा रक्तदात्यांचा सहभाग होता.
शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत संत निरंकारी फाउंडेशन च्या वतीने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन शेगाव तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दीप प्रज्वलन करून केले. या शिबिराला संत निरंकारी मंडळाचे जिल्हा संयोजक तथा ज्ञान प्रचारक संतोष शेगोकर, प्रतिष्ठित नागरिक विश्वंभर राऊत, श्रीधर महल्ले, कैलास पिसे ,सुरेश यादव ,संतोष पाटणे, विश्वनाथ आघाव, रमेश पानझाडे, पत्रकार अनिल उंबरकर, दिनेश महाजन, अमर बोरसे उपस्थिती होती. या शिबिराला उपजिल्हा रुग्णालय खामगाव येथून डॉक्टर देशमुख व त्यांची चमू व उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथून डॉक्टर बोर्डे व कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिराला उपस्थित राहून रक्तसंकलन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा