Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
अखिल भारतीय म.फुले समता परिषदेतर्फे...! ओबीसी आरक्षण बचाव भव्य मोर्चा आयोजना बाबत बैठक संपन्न..!
अखिल भारतीय म.फुले समता परिषदेतर्फे...! ओबीसी आरक्षण बचाव भव्य मोर्चा आयोजना बाबत बैठक संपन्न..!
धुळे(प्रतिनिधी) दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता समता परिषद व ओबीसी समाज बांधवांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या समस्त ओबीसी समाज बांधवांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षण या विषयावर चर्चा करण्यात आली असून समता परिषद व ओबीसी समाजाच्या वतीने दि. १ डिसेंबर रोजी धुळे येथे आयोजित मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीला समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब करडक, तसेच समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा.राजेश बागुल,जिल्हा कार्याध्यक्ष आर. के. माळी,जेष्ठ मार्गदर्शक आण्णा माळी सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच न्यायालयीन बाबींसाठी प्रदीप करडक,विभागीय सचिव संघटक सतिष नाळे, विभागीय सरचिटणीस अरुण थोरात, धुळे-नंदुरबार निरीक्षक नितीन शेलार, सोशल मिडीया प्रमुख संतोष पुंड यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.तसेच नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष भिमराव वारुडे,युवराज वारुळे,वाणी समाजाचे सुनील नेरकर,रविंद्र वाणी,तेली समाजाचे सतीषतात्या महाले,भगवान करनकाळ, उमेश चौधरी,गोविंदा करनकाळ,भोई समाजाचे कृष्णा फुलपगारे,गणेश मोरे, शत्रुघ्न तावडे,मातंग समाजाचे वाल्मिक जाधव,कुंभार समाजाचे सुरेश बहाळकर साहेब, लोहार समाजाचे भानुदास लोहार, मुस्लिम समाजाचे अशपाक शेख,शव्वाल अन्सारी,करीम मच्छीवाले,वंजारी समाजाचे श्रीरंग काकड, सुतार समाजाचे कैलास सुतार,नरेंद्र हिरे,धोबी समाजाचे कृष्णा धोबी, सुवर्णकार समाजाचे चंद्रकांत सोनार,राजेश सोनार,तसेच महाराष्ट्र माळी समाज महासंघ अखिल भारतीय माळी समाज संघटना,खान्देश माळी महासंघ,धोबी समाज,लोकक्रांती सेनेचे जेष्ठ मार्गदर्शक बी.एन.बिरारी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांनी केले तर आभार महानगरप्रमुख गोपाल देवरे यांनी मानले.
सदर बैठकीचे नियोजन समता परिषदेचे महानगरप्रमुख गोपाल देवरे,जिल्हा युवक अध्यक्ष योगेश बागुल, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ पाटील,संघटक जयराम बागुल,जिल्हा अध्यक्ष मल्ल संघटना सुमन वाडीले,युवक अध्यक्ष उमेश महाजन,साक्री तालुका सतिष बाविस्कर,शिरपूर तालुकाध्यक्ष पिंटू माळी, शिंदखेडा तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी,शहर सरचिटणीस राहुल महाजन,प्रशांत माळी, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख ज्ञानेश्वर माळी आणि कार्यकर्त्यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा