Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
न घाबरता नागरिकांनी लाचलुचपत विभागाकडे , तक्रारी दाखल कराव्यात: विभागीय अधिक्षक डॉ.खाडे
न घाबरता नागरिकांनी लाचलुचपत विभागाकडे , तक्रारी दाखल कराव्यात: विभागीय अधिक्षक डॉ.खाडे
उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.20 कोणत्याहीप्रकाराच्या शासकीय अथवा खासगी कामासाठी एखाद्या अधिकाऱ्याने किंवा व्यक्तीने कामासाठी पैशाची, वस्तूची मागणी केल्यास लाच देण्यासाठी नागरिकांनी स्पष्टपणे नकार दिला पाहिजे. तसेच लाचखोरीला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लाच लुचपत कार्यालयाशी संपर्क साधून त्याबाबत तक्रारी कराव्यात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलिस निरीक्षक गौरीशंकर पाबळे व अशोक हुलगे आदी उपस्थित होते.लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा असून याबाबत कायदेशीर कारवाई होऊ शकते. मात्र याची माहिती अनेक नागरिकांना नसल्यामुळे लाच देतात.
याबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आमच्या विभागाबरोबरच पत्रकारांनी देखील आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत जनजागृती करण्यासाठी मोठी भूमिका निभावणे महत्त्वाचे असून नागरिकांनी देखील त्यांच्याकडे एखाद्या व्यक्तीने किंवा अधिकाऱ्याने तसेच कर्मचाऱ्याने शासकीय किंवा खासगी स्वरूपातील काम करण्यासाठी लाच मागितली तर संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क करूण तक्रार देणे आवश्यक आहे.
तक्रार दाखल करणे आवश्यक असून तक्रार दाखल होताच याबाबत खात्रीशीरपणे व निश्चितपणे परंतू अतिशय गुप्तपणे संबंधित लाचखोरा विरोधात कारवाई करण्यात येते. तसेच उस्मानाबाद कार्यालयात याबाबत सतर्कता बाळगण्या बरोबरच ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे लाचलुचपत प्रतिबंधकविभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी सांगीतले.
आपली तक्रार दाखल करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक ०२४७२२२२८७९, १०६४, फॅक्स क्रमांक
२२२८७९ ,ई-मेल dyspacbosmanabad@mahapolice.gov.in
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा