Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०
हिंगोली जिल्ह्यातील चिमुकलीचे,मुख्यमंत्री ठाकरे यांना भावनिक पत्र.
हिंगोली (राहूल शिंदे)दि.15 सोनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील न्यू हायस्कूल गोरेगाव येथे इयत्ता सहावीत शिकणारी समिक्षा सावके या मुलीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपल्या वडिलांची व्यथा मांडली आहे.
परतीच्या झालेल्या अतिवृष्टीने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.यात हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन,उडीद पिके गेली व शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी पडले गेले.येणारी दिवाळी गोड होणार होती.परंतू नुकसान झाल्याने मुख्यमंत्री महोदय यांनी व लोकप्रतिनिधी यांनी पाहणी करून हेक्टरी दहा हजार रु मदत जाहीर केली.
जाहीर केलेली मदत देखील न मिळाल्याने बाल चिमुकलीने आपल्या कुटुंबाची व्यथा पत्रातून व्यक्त केली आहे.पैसे नसल्याने नवीन कपडे, फटाके, गोड-धोड सुध्दा मिळालं नाही.रात्री अपरात्री लाईट असल्यामुळे ऐन दिवाळीत देखील आपले वडील रात्री शेतात जाऊन शेत भिजवतात.
नुकसानभरपाईचे पैसे मिळताच कपडे आणू असे म्हणून,कुटुंबीयांवर दिवाळीच्या सणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.तरी मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ दखल घेऊन लवकर अनुदान वाटप करावे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा