Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जिल्ह्यातील प्रार्थनास्थळे 16 नोव्हेंबर पासून नागरिकांसाठी खुली ......-जिल्हाधिकारी दिवेगावकर
जिल्ह्यातील प्रार्थनास्थळे 16 नोव्हेंबर पासून नागरिकांसाठी खुली ......-जिल्हाधिकारी दिवेगावकर
उस्मानाबाद(राहूल शिंदे)दि.15जिल्ह्यातील कन्टेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रातील धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे यांचे ट्रस्ट/बोर्ड/नियामक प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार ती धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे नागरिकांसाठी खुली करण्यास दि. 16 नोव्हेंबर 2020 पासून परवानगी राहील. याठिकाणी नाकावर व तोंडावर मास्क/स्वच्छ रुमाल बांधणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग, वारंवार हात धुणे (hand wash) अथवा सॅनिटायर्झसचा वापर करणे बंधनकारक राहील. धार्मिक स्थळे / प्रार्थनास्थळे याठिकाणी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनां (SOP) चे पालन करणे आवश्यक राहील.
संबंधित स्थानिक प्राधिकरणास संबंधित व्यवस्थापकांशी विचारविनिमय करुन स्थानिक परिस्थितीचा विचार करता या आदेशातील नमूद मार्गदर्शक सूचना/प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये नवीन मार्गदर्शक सूचना / प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा समावेश करता येईल.
याचबरोबर सामाजिक अंतर व कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळावेळी दिलेल्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 16.11.2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष
कौस्तुभ दिवेगावकर यांनी कळविले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा