Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तहसीलदार आबा महाजन यांची कडक कारवाई..!



शिरपूर प्रतिनिधी:तहसीलदार आबा महाजन यांची खाजगी वाहनानंतर चक्क मोटारसायकल वरून पाठलाग करत वाळू उपसा करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर पहाटे धडक कार्यवाही शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांनी पहाटे आज दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी जातोडा वाघाडी रस्त्यावर मोटारसायकल वरून पाठलाग करीत वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही केली.

तालुक्यातील वाळू माफिया नेहमीच तहसीलदार आबा महाजन यांच्या शासकीय वाहनांवर लक्ष ठेऊन असल्याने तहसीलदार आबा महाजन यांनी हे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवीत वाळू माफियांवर कार्यवाही करीत असतात मागील कार्यवाही त्यांनी एका खाजगी वाहनाने ट्रॅक्टर चा पाठलाग करीत जप्त केले होते. 

तर आज चक्क मोटारसायकल वर बसून तालुक्यातील वनावल येथील गुड्डू भटू गिरासे यांच्या मालकीचे अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कार्यवाही करीत जप्त केले व प्रांत कार्यालयात दंडात्मक कार्यवाही साठी जमा केले सदर कार्यवाही तहसीलदार आबा महाजन, मंडळ अधिकारी बोरसे, तलाठी भावसार, जी आर सोनवणे, वाहन चालक सतीश पाटोळे यांनी केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध