Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांची अहमदाबाद येथील झायडस (कॅडीला) बायोटेक पार्क कंपनीला भेट,
पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांची अहमदाबाद येथील झायडस (कॅडीला) बायोटेक पार्क कंपनीला भेट,
शिरपूरकरांसाठी प्राऊड मोमेंट
शिरपूर : भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी शनिवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे झायडस (कॅडीला) बायोटेक पार्क कंपनीला भेट दिली. त्यावेळी माजी खासदार स्वर्गीय मुकेशभाई पटेल यांचे व्याही डॉ. पंकजभाई पटेल, जावई डॉ. शरविलभाई पटेल तसेच सौ. मेहा पटेल (स्व. खा. मुकेशभाई पटेल साहेब यांची सुकन्या, स्व. तपनभाई पटेल यांच्या भगिनी), नातू शौर्य पटेल, नात वेदा पटेल यांनी या सुवर्ण क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल व शिरपूर चे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांची पुतणी सौ. मेहा पटेल ही अहमदाबाद येथील डॉ. पंकजभाई पटेल, जावई डॉ. शरविलभाई पटेल यांच्या परिवारात असल्याची बाब भूषणावह आहे.
संपूर्ण जग कोरोनाच्या महामारी मुळे हैराण झालेले असताना कोरोना लस बनविण्यासाठी संपूर्ण भारत देशात अहमदाबाद येथील झायडस (कॅडीला) बायोटेक पार्क कंपनीने पुढाकार घेऊन कोरोना लस बनविण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा गाठल्याची बाब कौतुकास्पद आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी कंपनीला विशेष भेट देऊन सुसंवाद साधला.
शिरपूरकर जनतेसाठी तसेच पटेल परिवारासाठी, धुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा प्राऊड मोमेंट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा