Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

भोई ,धनगर ,पारधी नाथ जोगी,समाजासाठी स्मशानभूमी करिता जागा उपलब्ध करण्याची मागणी.


शेगाव (उमेश राजगुरे)दि.3 शेगाव शहरातील भोई समाज, धनगर समाज, नाथजोगी समाज व पारधी समाज बांधवांसाठी स्मशानभूमी करिता जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेगाव शहरात ज्या ठिकाणी आतापर्यंत पूर्वजांकडून  दफनविधी करण्यासाठी जागा होती. त्या जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे वरील चार ही समाज बांधव समोर स्मशानभूमीची समस्या उभी राहलेली आहे .शेगाव येथील बौद्ध समाज बांधवांनंच्या स्मशानभूमीजवळ असलेली जागा भोई, धनगर ,पारधी,नाथजोगी समाज समाजासाठी स्मशानभूमी करिता उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली.

 या निवेदनावर योग्य निर्णय न झाल्यास  उपोषण वजा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनावर समाज सेवक उमेश राजगुरे , समाज सेवक योगेश नळेकर,  नगर सेवक शैलेश डाबेराव, सुखदेव डाबेराव माजी नगरसेवक, राजू गाडगे संजय राजगुरे ,रामदास घुले समाज सेवक,श्रावण पुंडे,सागर घुले, बाबुराव घट्टे, वसंता सोळंके, महादेव कुकडे, उमेश नंदाने, राजेश नंदाने, प्रमोद कुकडे, सोपान श्रीनाथ, गजानन राजगुरे, नितीन राजगुरे,  सागर नंदाने, प्रतीक सोनवणे, सुखदेव कुकडे, प्रवीण नंदाने, अशोक मोरे, गोविंदा कुकळे, विष्णू वाघमारे , महादेव श्रावणे, सचिन कंडाळे, सुरेश मिश्रीय, दिलीप सुरेख, गणेश राजगुरे, पांडुरंग डांगे, विलास पुंडे, सचिन नांगे, विनोद डाबेराव, गजानन घट्टे, नागोराव डाबेराव, सुरसिंग डाबेराव, मधुकर डाबेराव, बाजीराव सोळंके, मानसिंग सोळंके, किसन चव्हाण, अनिल सोळंके, उमेश सोळंके, संजू डाबेराव, किशोर डाबेराव, दिनेश राठोड, सहदेव पवार, राजेश पवार,यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध