Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०
एस.टी.महामंडळाच्या वाहकाने घरात गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली..!
जळगाव:प्रतिनिधी:आर्थिक अडचणीला वैतागून आज सकाळी एस.टी. महामंडळाच्या वाहकाने घरात गळफास घेत आपले जीवन संपवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव बस आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेले मनोज अनिल चौधरी (३०) रा.कुसुंबा) हे गेल्या काही दिवसांपासून पगाराच्या अनियमित्तपणामुळे त्रस्त झाले होते. पगार आधीच कमी आणि तो देखील वेळेवर नाही, अशा अवघड परिस्थितीत त्यांनी आज आपले जीवन संपवले.
गळफास घेण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमिततेला कंटाळून मी आत्महत्या करत आहे. या आत्महत्येस एसटी महामंडळाची कार्यपद्धती तसेच ठाकरे सरकार (शिवसेना) जबाबदार असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. घरच्या सदस्यांचा यात काही संबंध नसल्याचे देखील म्हटले आहे.
संघटनांनी माझा पीएफ व एलआयसी परिवारास मिळवून देण्यास प्रयत्न करावा असे त्यांनी म्हटले आहे.
संतप्त नातेवाईकांनी महामंडळाचे अधिकारी येऊन आश्वासन देत नाही तोवर मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा