Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळावर पर्यावरणप्रेमी सुनिल मोरे यांची विभागीय संघटन मंत्रीपदी निवड..!
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळावर पर्यावरणप्रेमी सुनिल मोरे यांची विभागीय संघटन मंत्रीपदी निवड..!
शिंदखेडा:प्रतिनिधी जेष्ठ समाजसेवक यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या 'निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ या संस्थेची राज्य कार्यकारिणीची निवड नुकतीच जाहीर करण्यात आलेली असून यात धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील उपक्रमशील शिक्षक तथा हस्तशिल्पकार सुनिल मोरे यांनी विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देतानाच पर्यावरण रक्षण- संवर्धन व जनजागृती यातील भरीव योगदानाची दखल निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेने घेऊन सुनिल मोरे यांची राज्याच्या कार्यकारिणीवर विभागीय संघटन मंत्रीपदी सार्थ निवड केली
आहे.
सुनिल मोरे यांनी केवळ नोकरीपुरता बांधिलकी न ठेवता काहीतरी वेगळं करावं आणि पर्यावरणाचे अंग जोपासवे या निसर्गप्रेमी आणि निस्वार्थ भावनेतून 'पुनर्वापर निसर्ग साधनसंपत्तीचा- मंत्र पर्यावरण रक्षणाचा' या मध्यवर्ती सूत्रावर आधारित आजवर हस्तकलेच्या माध्यमातून अनेकांना प्रशिक्षित केले असून पर्यावरण रक्षणासह रोजगाराचा मार्ग दाखवत आपले भरीव योगदान देत असल्यामुळे त्यांची निवड करीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी सांगितले आहे त्याचप्रमाणे सुनिल मोरे आपल्या बुध्दीकौशल्यातून व आपल्या अंगी असलेल्या हस्तकलेच्या माध्यमातून राष्ट्रहित व समाजहित जोपासत पर्यावरणपूरक कामास अधिक गती देतील व संस्थेचे नाव उज्ज्वल करतील अशी अपेक्षा व्यक्त करत सुनिल मोरे यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा हा सन्मान आहे असेही अध्यक्ष महोदयांनी सांगितले.
सुनिल मोरे यांच्या विभागीय संघटन मंत्रीपदी झालेल्या निवडीबद्दल पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे, विलासराव महाडिक,डॉ.जगदीश पाटील,जळगाव जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांच्यासह सर्व सामाजिक ,राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा