Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
मुंबईवरील दहशतवादी हल्यातील शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन...!
मुंबईवरील दहशतवादी हल्यातील शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन...!
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी नागरिकांचं रक्षण करताना शहीद झालेले मुंबई पोलिस दलातील अधिकारी, एनएसजी कमांडो व गृहरक्षक दलातील जवानांचे शौर्य व त्यागाचे स्मरण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली आहे. या हल्ल्यावेळी प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांनाही उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
दहशतवादी हल्ल्याची जखम आजही भळभळतीच
मुंबईवरील दहशतवादी हल्यातील शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.'मुंबईवरील हल्ल्यावेळी मुंबई पोलीस व सुरक्षा दलांनी केलेला दहशतवाद्यांचा मुकाबला हा गौरवशाली इतिहास आहे. त्या हल्ल्यावेळी मुंबईच्या रक्षणासाठी पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी, जवान स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरला. प्राणांची पर्वा न करता कर्तव्यनिष्ठेने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या वीराने शरीरावर गोळ्या झेलून अजमल कसाबसारखा आत्मघातकी दहशतवादी जिवंत पकडून दिला.
मुंबई पोलिसांच्या या पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुंबई पोलिसांनी देशाच्या रक्षणासाठी बजावलेलं कर्तव्य, केलेला सर्वोच्च त्याग देशवासीयांच्या कायम स्मरणात राहील. मुंबई पोलिसांचं हौतात्म्य सर्वांना देशसेवेची व कर्तव्याची जाणीव करून देईल. नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ करील',असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दहशतवादी हल्ल्यावेळी मुंबई पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून लढताना भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय सुरक्षा दल,गृहरक्षक दल, अग्निशमन दल, भारतीय रेल्वे, आरोग्य सेवेचे डॉक्टर-कर्मचारी, रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी, हॉटेल ताज व ट्रायडंट हॉटेलचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह शहरातील नागरिकांनीही एकजूट, देशभक्ती, साहस, मानवतेचे अलौकिक दर्शन घडवले. या सर्वांच्या त्याग, कर्तव्यनिष्ठेबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दहशतवादी हल्यातील शहीद पोलीस वीरांना श्रद्धांजली वाहत असताना मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी बांधवांनी शहरासाठी सातत्याने केलेला त्याग तसेच करोना संकटकाळात बजावलेल्या कामगिरीचंही उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आहे. करोनाशी लढताना प्राण गमावलेल्या पोलीस बांधवांनाही त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना श्रद्धांजली वाहत असताना यापुढच्या काळात शहराचं पोलीस दल आधुनिक शस्त्रास्त्र, संपर्क यंत्रणा तसेच शारीरिक व मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम असेल.मुंबई पोलिसांचं मनोबल सदैव उंच राहील. जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस दल ही प्रतिमा अधिक ठळक होईल, यासाठी शासन व नागरिकांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा