Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०

आले कुटून आणि गेले कुटे हे कडेना चेहऱ्यावर रुमाल बांधून आलेल्या संशयिताने 16 वर्षीय युवतीला ओढत कारमध्ये बसवून अपहरण…!



शिरपूर प्रतिनिधी:चेहऱ्यावर रुमाल बांधून बसस्थानक येथून अल्पवयीन मुलीला ओढून कारमध्ये बसवून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16 वर्षीय युवती तिच्या काकूसोबत धार्मिक कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे जाण्यासाठी शिरपूर शहर बसस्थानकात दुपारी 12 वाजेच्या सुमारास पोहचले.वेळेत बस नसल्याने त्या बसस्थानक बाहेर येऊन खाजगी रीक्षात बसले.मुलीला मळमळ होऊ लागल्याने ती उलटी करण्यासाठी रीक्षाच्या मागच्या बाजूस गेली.

बराच वेळ झाल्याने ती परत न आल्याने तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.त्या परिसरातील महिलांना विचारपूस केली असता.एक संशयित पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये येऊन त्या 16 वर्षीय युवतीला ओढत कारमध्ये बसवून घेऊन गेल्याची माहिती मिळाली.त्याचा पाठलाग केल्यावर तो सांगवीच्या दिशेने निघून गेल्याचे आढळले.याबाबत त्या युवतीच्या काकूने शहर पोलिसात याबाबत गुन्हा दाखल केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध