Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ डिसेंबर, २०२०

डॉ.प्रशांत करंजकर यांच्या वाढदिवसा निमित्त,51 रक्तदात्यांचे रक्तदान...




करमाळा (राहूल शिंदे) दि.19 येथील डॉ.प्रशांत करंजकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजितकेलेल्या महारक्तदान शिबिरात तब्बल 51 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.सविस्तर वृत्त असे की, दिनांक 15डिसेंबर रोजी प्रकृती हॉस्पिटलच्या आवारात आयोजित महारक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ.प्रशांत करंजकर यांच्या हस्ते झाले.

covid-19 महामारी मुळे रक्त संकलनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे ही रक्ताची गरज ओळखून डॉ.प्रशांत करंजकर यांच्या सूचनेनुसार करमाळा तालुक्यात रक्तदान सप्ताह राबवला जात आहे. त्यानुसार दि.15 पासून शहरात महारक्तदान शिबिरास प्रारंभ झाला आहे.

यावेळी राहूल शिंदे,उत्तरेश्वर सावंत, समाधान चोबे,विक्रम आलाट,वैभव शिंदे,अशोक सावंत आदी उपस्थित होते.करमाळा तालुक्यातील सर्व डॉक्टर असोशियन उपस्थित राहून सहकार्य केले यावेळी उपस्थित डॉ.विशाल शेटे, डॉ.बालाजी कटके डॉ.पाटील करमाळा तालुक्यातील सर्व डॉक्टर यांनी सहभाग घेतला.

ब्लड संकलन करण्यासाठी भगवंत ब्लड बँक बार्शी यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध