Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १९ डिसेंबर, २०२०
यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही..!डॉ.राजेंद्र भारुड...!
तोरखेडा तालुका शहादा तोरखेडा (वार्ताहर बी एस मण्यार) दि. 18 :कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही. दत्त जयंतीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करून आवश्यक व्यवस्था करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
सारंगखेडा यात्रेबाब जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या मर्यादीत राहील आणि शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. मंदिरात पारंपरिक विधी आणि भाविकांचे दर्शन सुरू राहील. मंदिर परिसरात केवळ 50 व्यक्तींना एकावेळी प्रवेश द्यावा. इतर भाविकांना टप्प्याटप्प्याने तेथे आणण्याची व्यवस्था करावी. भाविकांनां योग्य रांगेत उभे रहाण्यासाठी खूणा करण्यात याव्यात.
रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. दत्त जयंतीच्या दिवशी गरजेनुसार स्थानिक प्रशासनाने एक किंवा दोन तास वेळेत वाढ करावी. आरोग्य विभागाने मंदिर परिसराचे दररोज निर्जंतुकीकरण करावे आणि थर्मल स्कॅनरची व्यवस्था करावी. ग्रामपंचायतीने दोन ठिकाणी साबणाने हात धुण्याची व्यवस्था करावी. फुले आणि नारळाच्या दुकानांची संख्या मर्यादीत ठेवावी व अशा दुकानांची माहिती पोलीसांना द्यावी. निवडणूक आचारसंहितेचे सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.
श्री.पंडीत म्हणाले, भाविकांची गर्दी वाढल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे बैठक व्यवस्था करावी. मंदिर परिसरात त्यांना ठरावीक अंतराने सोडावे. परिसरात नियंत्रण कक्ष स्थापित करून त्यात सर्व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे. मास्कशिवाय भाविकांना मंदिरात प्रवेश देऊ नये, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस विविध विभागाचे अधिकारी आणि मंदिर समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
----
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा