Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ६ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
" रक्तदान कार्य महान महारक्तदान शिबिर शिरपूर विधानसभा युवासेनेच्या वतीने संपन्न..!
" रक्तदान कार्य महान महारक्तदान शिबिर शिरपूर विधानसभा युवासेनेच्या वतीने संपन्न..!
धुळे(शिरपूर)आज दि.०६ /१२/२०२० रोजी "माझे कुटुंब माझी जबाबदारी" तसेच आणि महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख सन्मा.श्री.उद्धव ठाकरेसाहेब यांच्या संकल्पनेनुसार कोरोना आटोक्यात येत आहे तरी सध्या राज्यभरात रक्तपुरवठयाचा तुटवडा निर्माण झाला म्हणून सन्मा.मंत्री तथा युवासेनाप्रमुख मा.श्री.आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात युवासेनेतर्फे शिरपूर विधानसभा क्षेत्रात रविवार शिवसेना कार्यालय शिरपूर येथे सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
त्यावेळी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिवस साजरा करण्यात आला अनुषंगाने 'माझी कुटुंब, माझी जबाबदारी' शिरपूर विधानसभा क्षेत्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.त्यावेळी इंजि.हेमंत साळुंखे धुळे जिल्हाप्रमुख
(ग्रामीण),उपजिल्हा प्रमुख-श्री.भरतसिंग राजपूत,उपजिल्हा संघटक-श्री.भाईदास पाटील,तालुका प्रमुख-दिपक चोरमले, तालुका प्रमुख-अत्तरसिंग पावरा, तालुका संघटक-श्री.योगेश सूर्यवंशी, शहर प्रमुख-श्री.मनोज धनगर,उपतालुका प्रमुख-श्री.मंगलसिंग भोई,शहरसंघटक-प्रेम चौधरी, उपशहर प्रमुख-बंटी लांडगे,योगेश ठाकरे,देवाजी पाटील,दिनेश गुरव,जितेंद्र पाटील,अशोक मिस्त्री,पिंटू शिंदे,दिपक धनगर,अविनाश ठेलारी,विजय जोगराणा,गोरख कोळी,सागर कोळी,भूषण गोसावी,कुणेश बोरसे महिला आघाडी-श्रीमती.वीणाताई वैद्य,श्रीमती.अर्चना देसले ,भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्याल धुळे डॉ.शलका तुपकरी ,निलेश सुराने,अविनाश सूर्यवंशी, संजय चौधरी डॉ.टीम व आदी शिवसैनिक उपस्थित होते.शिवसेना कार्यालय, पोस्ट ऑफिस समोर शिरपूर येथे शिबीर घेण्यात आले. युवासेनेचे- रोशन सोनवणे, अनिकेत बोरसे,विजय पावरा, निखिल मराठे, शिबीराचे आयोजन यांनी केले. नागरिकांना, युवक-विद्यार्थ्यांना तसेच रक्तदात्यांना नम्र आव्हान केले होते की जगात कोरोना महामारीने धुमाकूळ घातल्या मुळे सर्व जग थांबले होते.
या संकटाला सर्वांनी त्यांच्या परीने तोंड देऊन, डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय अधिकारी, मनपा कर्मचारी, पोलिस, पत्रकार सर्वच योद्धे महाराष्ट्र - देश वाचविण्यासाठी सतत लढत होते. आज कुठे संकटातून आपण बाहेर येत आहोत परंतु संकट टळलेले नाही. आज ही मोठ्या प्रमाणात रक्तदानाचा तुटवडा भासत असून तो भासू नये यासाठी रक्तदान आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत होता. रक्तदान सर्वत्र आवश्यकता असून त्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येणे गरजेचे होते.
रक्ता अभावी कोणाही बांधवांचा जीव जाऊ नये. रक्तदानाचे आयोजन करून आता जो रक्ताचा तुटवडा भासत होता तो भरून निघेल यासाठी रक्तदान केले तसेच युवासेनेच्या माध्यमातून रक्तदानाचे आयोजन केले. यावेळी मोठ्या संख्येने सर्वांनी सहभाग नोंदवला. रक्तदानामुळे आपल्या बांधवांचा जीव वाचवण्यात आपली मदत होईल.
आपण सर्व मिळून रक्तदान केले आणि आपल्या बांधवांचा जीव वाचवूया असे आव्हान युवासेना धुळे जिल्हाप्रमुख ऍड. पंकज गोरे यांनी सर्व बांधवांना केले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा