Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ६ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
माजी मुख्याध्यापिका विनयभंग प्रकरणी प्राचार्य धिरज बाविस्कर यांना शिर्डी येथे अटक..!या घटनेमुळे तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली..!
माजी मुख्याध्यापिका विनयभंग प्रकरणी प्राचार्य धिरज बाविस्कर यांना शिर्डी येथे अटक..!या घटनेमुळे तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली..!
शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर येथील चोपडा फाट्यावर एस आर बी इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन प्राचार्य डॉक्टर धिरज तुकाराम बाविस्कर यांना शिर्डी पोलिसांनी 4 डिसेंबरला अटक केली आहे.या स्कूलच्या माजी महिला मुख्याध्यापिकेच्या विनयभंग करणे, तिच्याकडून लोन साठी घेतलेला चेकच्या दुरुपयोग करणे आदी कारणांवरून त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
संबंधित 46 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून त्या कार्यरत होत्या ऑगस्ट 2019 ते 2020 या कालावधीत शिर्डी परिसरातील राहते सर व एस आर बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विनयभंग केला आहे. तिच्या पाठलाग करून आलिंगन देत नियमांचा भंग केला त्यावेळी मी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल हँडसेट फेकून फोडून नुकसान केले तिचे लैंगिक छळ केला व प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिला शिवीगाळ करून मारहाण केली व धमकावले असे फिर्यादीत नमूद केले आहे.
सदर महिलेची चेकद्वारे फसवणूक झाल्याची देखील फिर्यादीत नमूद आहे संशयित डॉक्टर धिरज बाविस्कर यांनी पीडित महिला यांच्याकडे नोकरीस असताना तिला कर्ज हवा असल्याकारणाने बँक ऑफ बडोदा च्या कोरा घेतला होता तो स्वतः जवळ ठेवून घेतला त्यावर व 2 लाख 84 हजार 200 रुपये टाकून बॅंकेत सादर करून तिची फसवणूक केली आहे शिवाय या महाशयांनी दुसऱ्या शिक्षकांसोबत देखील गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यावरून शिर्डी पोलीस ठाण्यात डॉक्टर बाविस्कर यांच्याविरोधात भादवि कलम 354, 323, 504, 506 ,420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा