Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

पिंप्रीगवळी गावातील लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव पारित..!



मोताळा तालुका प्रतिनिधी - पिंप्रीगवळी गावातील सरपंच यादवराव रामदास हुडेकर यांच्या मनामनी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायत सदस्य यांनी दिनांक 14/12/2020 रोजी तहसीलदार मोताळा यांचेकडे अविश्वास ठराव नोटीस दिली होती. त्यानुसार अध्याशी तहसीलदार यांनी दिनांक 18/12/2020 रोजी खास सभा घेण्याचे आदेश दिले त्यानुसार बहुमत सिद्ध करण्यात आले ग्रामपंचायत पिंप्रीगवळी येथील सदस्य संख्या अकरा व सरपंच असे एकूण बारा लोकांची बॉडी असुन त्यापैकी महिला सदस्यां आठ व पुरुष सदस्य तीन असे आहेत.

त्यामधील सात महिला व तीन पुरुष सदस्यांनी सरपंच यांच्या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळून तसेच गावातील लोकांच्या समस्या न सोडावीने असे विविध कारणामुळे सरपंच यांना घरचा रस्ता दाखविला.आज 18/12/2020 रोजी झालेल्या बहुमत चाचणी घेण्यापूर्वी विरुद्ध असलेले सदस्य यांनी हात उंच करून व आवाजी पद्धतीने मतदान करण्याची विनंती केली.

त्या विनंती अर्जावर सौं सुनीता संदीप चौधरी,सौं योगिता सुभाष कापसे, सौं प्रेयल श्रीकांत खर्चे,सौं सविता गणेश खराटे, सौं विद्या समाधान सुरळकर,सौं वैशाली गजानन कातोरे, सौं रुपाली योगेश क्षीरसागर, श्री नितीन अशोक खराटे, दिवाकर धनु लहासे, श्री श्रीकृष्ण बारसु वराडे या एकूण दहा लोकांच्या सह्या आहेत. एक महिला सदस्यां सौं आशा रवींद्र पवार ह्या गैरहजर राहिल्याने सरपंच हुडेकर यांची मोठी कोडी झाली.त्यानंतर सरपंच यादवराव हुडेकर यांचे बाजुने एकही मत मिळाले नाही विरुद्ध बाजुने एकतर्फी म्हणजे दहा मते मिळाली. त्यानंतर अद्याशी तहसीलदार यांनी ठराव मंजूर करून पुढील कारवाई साठी जिल्हाउपधिकारी यांचे कडे पाठविला आहे.

आता पुढील नवीन सरपंच कोण होणार याकडे गावातील व पंचक्रोशीतील सर्वांचे लक्ष लागले आहेत. त्यासाठी उर्वरित सदस्यांना कसरत करावि लागणार आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध