Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २ डिसेंबर, २०२०
आत्महत्या हा पर्याय नाही……!
खामगांव : आयुष्याची सुरुवात होते ती एका मोठया शर्यतीतून,ती शर्यत असते आईच्या गर्भात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची,खूप मोठी लढाई असते ती जिंकलो म्हणजे तिच्या गर्भात नऊ महिने प्रवास आणि नंतर बाहेर येण्याची घाई,स्वतःला आईपासून आता वेगळं करायचं असत म्हणून धडपड,,पण तिच्या मरणयातना नेहमी आठवत रहाव्या,ह्या शर्यतीत आपलं स्थान निर्माण करणं ही सगळ्यात मोठी शर्यत जिंकणे आता लहानाचे मोठे होत असताना तीच बोट तीच तुम्ही आजारी असतानाच जागरण,,जरा ताप वाढला तर डोळ्यात गरगर पाणी उभं रहात हे आठवा मोठे होतो,स्वतःच्या पायावर उभे रहाण्याचा प्रयत्न ,,तिची देवाकडे तुमच्यासाठीची धाव आठवा,,,, ज्यावेळी मोठे होता त्यावेळी जस वादळ येईल तस उपणायच ,,स्वप्न बघायची ती पूर्ण करण्यासाठी मग मार्ग कसा आहे ह्याचा विचार करू नका,,,जितके मोठे स्वप्न तितकी मोठी परीक्षा,,, मुंगीपासून जिंकणं शिका,,अडचणी कुणाच्या आयुष्यात नाहीत
आणि हो अडचणी आहेत म्हणून मार्ग काढण्याची ताकद मनगटात उतरते,,,स्वतःच्या कामात कमी पडू नका म्हणजे कुणापुढे झुकावे लागणार नाही,,काम तर करायचंच आहे ना मग मनातून करा डोक्यातून कराल तर नक्कीच आजारपण लागतील,,,राग आणि चिडचिड म्हणजे कामातून माघार असते,,तुमचा राग आणि चिडचिड ह्यातून तुम्ही आमंत्रण देता ते थायरॉईड,,शुगर आणि ब्लड प्रेशर सारख्या आजारांना ,,,अरे राग येतो म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या मेंदूने काम करत आहात ना ,, स्वतःच्या मेंदूला दुसऱ्याच्या हातात दिल तर तुमचं स्वतःच अस्तित्व संपुष्टात येणार आणि राहील तो डोक्याला ताप,,,,प्रेमाने प्रेम मिळते ,,प्रेमाने जग जिंकता येत,,प्रेमाने राक्षसी स्वभावसुद्धा बदलता येतो फक्त तुमची वाणी,, तुमचे कर्तव्य ह्यात चुकू नका,,,,ताणतणाव,,
आजारपण ,,उतारचढाव येतच राहणार पण सगळ्या परिस्थितीत तुम्ही कसे खंबीर राहणार ,,,बस स्वतःशी प्रामाणिक रहा वाट मोकळी होत राहील,,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा