Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २० डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शिंदखेडा तालुक्यातील सार्वे गावाचा विवाह सोहळ्याचा आदर्श इतर समाजाने सुध्दा घ्यावा भेटवस्तूंऐवजी रक्तदान...!
शिंदखेडा तालुक्यातील सार्वे गावाचा विवाह सोहळ्याचा आदर्श इतर समाजाने सुध्दा घ्यावा भेटवस्तूंऐवजी रक्तदान...!
शिंदखेडा प्रतिनिधी ता.१९:कोरोना संकट व जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सावें
ता.शिंदखेडा येथे शनिवारी लग्नसमारंभात
उपस्थितांसाठी रक्तदान शिबिराचे
आयोजन आपल्या लाडक्या लेकीच्या विवाहनिमित्त वधूपित्याने एक वेगळा उपक्रम राबविला.वधू-वरांनी रक्तदान
करूनच लग्नाच्या गाठी बांधल्या.
याशिवाय मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक लाख अकरा हजार रुपये देणगी दिली.
सावे येथील तुषार आत्माराम पाटील यांची कन्या स्वाती हिचा विवाह शिरपूर येथील
दशरथ काशीराम पाटील यांचा मुलगा दर्शन यांच्याशी शनिवारी झाला.
मुलीचे काका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शरद पंडितराव पाटील यांनी
सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून ग्रामस्थ व व-हाडींसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन
केले.वर दर्शन व वधू स्वाती यांनी सर्वप्रथम रक्तदान केले.आपल्या सग्यासोयन्यांनसोबतच
परिसरातील युवकांनी रक्तदान केले. १०१ बाटल्या रक्त जमा झाले.
लग्नसमारंभात उपस्थित मान्यवर
माजी मंत्री रोहिदास पाटील,शिंदखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी,ज्ञानेश्वरभामरे,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
श्याम सनेर,नगराध्यक्ष अनिल वानखेडे, तहसीलदार सुनील सैंदाणे,नेहकरचे पोलिस निरीक्षक ए.एम.प्रधान,संदीप बेडसे,
पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन,
राजेंद्र महाजन, बाभळेचे लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील,नगाव गटाचे जिल्हा
परिषद सदस्य राम भदाणे,डॉ.अजय सोनवणे,कलमाडीचे विजेंद्र झालसे,माजी सभापती किशोर पाटील,महेश ईशी,
श्रीराम ईशी,निळकंठ रघुवंशी आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा