Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २० डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जामनेर शास्त्रीनगर मधील गुरांना ईंजेक्शन देऊन चोरी करण्याचा प्रयत्न फसला रितेश भोई यांच्या सतर्कतेने व नागरिकांमुळे गायींचे वाचविले प्राण...!
जामनेर शास्त्रीनगर मधील गुरांना ईंजेक्शन देऊन चोरी करण्याचा प्रयत्न फसला रितेश भोई यांच्या सतर्कतेने व नागरिकांमुळे गायींचे वाचविले प्राण...!
जामनेर: प्रतिनिधी जामनेर येथील शास्त्रीनगर मध्ये शुक्रवारी मध्यरात्री सुमारे ३ वाजेच्या सुमारास गुरांना बेशुध्द करण्याच्या हेतुने त्यांना भुलचे ईंजेक्शन देऊन रातो-रात पाच-सहा गाईंना अशोक लेलँड कंपनीच्या गाडीत जितेंद्र काळे यांच्या घराजवळ चोरट्यांनी गायींना गाडीत टाकले, असता चोरट्यांच्या व गाडीच्या आवाजाने शेजारील रितेश भोई यांना जाग येऊन ते बाहेर आले.तेव्हा त्यांच्या लक्षात आले की चोरटे गुरांना गाडीमध्ये टाकत आहे. त्यावेळी त्यांनी आजु-बाजुच्या लोकांना आरोळ्या मारून उठविले.यावेळी कैलास पालवे,रवींद्र झाल्टे,रितेश भोई व जितेंद्र काळे, विशाल भोई व नागरिक यांनी काहींना चोप दिला,
परंतु सहा-सात चोरटे हाताला झटका दिला आणि अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.लागलीच पोलीसांशी संपर्क साधला असता पोलीस उपनिरीक्षक आंबादास पाथरवट घटनास्थळी पोहचले,त्यांनी गाडीला ताब्यात घेतल्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी श्रीकांत व्यवहारे यांनी गुरांना तपासुन प्रथोमोपचार केले.याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन घटनेचा तपास पो काँ दिलीप वाघमोडे करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा