Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०
श्री.महादेव मंदिर व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव सोहळा संपन्न...!
शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर येथे दि.२९
३०डिसें.रोजी म्हाळसा माता मंदिरापासुन वरवाडे,फुले नगर, बाजीराव नगर सर्व परिसरातुन महादेवाची पिंड व हनुमानाची मुर्ती,कळसाची शोभायात्रा सर्व भक्तांनी वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. तसेच ११ जोडप्यांच्या हस्ते प्रतिष्ठाचार्य संदिप महाराजांनी होमहवन करून महाआरती केली यात प्रमुख अतिथी आ.अमरीशभाई पटेल,आ.काशिराम पावरा, शि.व.न.पा.नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, शि.व.न.पा.उपनगराध्यक्ष.भुपेशभाई पटेल,जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, आर.सी.पटेल चेअरमन,राजु भंडारी, नगरसेवक सुरेश बागुल, नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी, नगरसेवक दिपक महादु माळी ,माजी उपनगराध्यक्ष काशिनाथ माळी,माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, माळी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, सामाजिक कार्यकर्ता भालेराव माळी यांच्या उपस्थितीत महाआरती आयोजन करण्यात आले होते.
परमपुज्य शंभुशरण महाराज निळकंठ महादेव मंदिर, परमपुज्य मिरचीवाले बाबा, गुरुवर्य परमपुज्य नागा बाबा संत सरसपुरीजी बापु स्थान राधा कृष्ण भक्ती धाम आश्रम सावेर यांच्या हस्ते कळस पुजा करण्यात आली. रात्री ९ वा.श्री.संत सावता माळी भजनी मंडळ वरवाडे यांनी धार्मिक वातावरणात भजनांचा आनंद घेतला यात दहिवद,उंटावद,साकवद,बाळदे ,शिरपुर भजनी मंडळांनी अभंग,भावगीत,गवळण शिरपूर पंच क्रोशीतील भजनी मंडळांनी आनंद घेतला या सर्व कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले नगर मांडळ रोड व बाजीराव नगर सर्व भक्तांनी केले होते.
महाप्रसादाचे मानकरी सागर उद्योग मिरची मसाला शिरपूर ,लक्ष्मण माळी ( जम्मुनाना) होते मंदिरास सर्व भक्तांचे सहकार्य लागले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा