Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
शत्रूपासून बचावासाठी अहिल्याबाईंनी महेश्वरात बांधला किल्ला पर्यटकांची आजही होतेय गर्दी...! मराठा शिलाकृतीत तयार केला किल्ला...!
शत्रूपासून बचावासाठी अहिल्याबाईंनी महेश्वरात बांधला किल्ला पर्यटकांची आजही होतेय गर्दी...! मराठा शिलाकृतीत तयार केला किल्ला...!
शिरपूर:उत्तम, शासक प्रशासक व महिला राज्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी शत्रूपासून बचावासाठी मध्यप्रदेशातील दक्षिणपूर्व भागात महेश्वर येथे भव्य किल्ला तयार करून घेतला. बांधकामाचा उत्कृष्ट नमूना असलेल्या या किल्ल्याला आजही राज्या-परराज्यातून पर्यटक हमखास येतात.
शिरपूर शहरापासून 140 किलोमीटर अंतरावर महेश्वर असून 1754 मध्ये खांडेराव होळकर हे कुंबेराच्या युध्दात धारातीर्थी पडल्यानंतर अहिल्याबाई होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी राज्याचा कारभार पाहिला परंतु त्यांचेदेखील 12 वर्षांनी निधन झाल्यामुळे राज्याची सर्व सूत्र महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या हातात आली.
मराठा शिलाकृतीत तयार केला किल्ला
इंदौरच्या दक्षिणेस महेश्वरात त्यांनी राजधानी हलवत पवित्र नर्मदा नदीकाठी भव्य किल्ला तयार केला शिवाय नर्मदा नदिकिनारी बांधण्यात आलेले महेश्वर भव्य मंदिरासाठी सुध्दा प्रसिध्द आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्या प्राचीन किल्ल्याचे बांधकाम मुघल बादशाह अकबर यांनी 1601 मध्ये केले होते. ज्यावेळेस महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी हा भाग जिंकून येथेच आपले घर तयार केले व बाकीचे काम अहिल्याबाई यांनी केले. हा किल्ला मराठा शिलाकृतीत तयार करण्यात आला आहे. महाराणी अहिल्याबाई एक सशक्त शासक होत्या.
अहिल्याबाई होळकर न्यायदानासाठी प्रसिद्ध अहिल्यादेवी होळकर यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या.
त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने उद्ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. 1767 पासून ते 1795 पर्यंत मराठा होळकर शासनाचा कारभार सांभाळत त्यांनी नेतृत्व केले. अनेकवेळा युद्धाच्या मैदानावर अहिल्याबाई होळकर स्वत: उतरत सेनेचे नेतृत्व करीत असत.
कलेचीदेखील आवड
अहिल्याबाई होळकर यांना या भगवान शिवाच्या मोठ्या भक्त होत्या. त्यांनी भारतात मोठ्या संखेने मंदिरे धर्मशाळा आणि घाट तयार केले शिवाय त्यांना कलेची सुध्दा खुप आवड होती. सुरतच्या बुनकरांना महेश्वरमध्ये त्या काळात आणण्यात आले व तेथेच त्यांना काम करण्याचा आग्रह करून साळीवर खास डिीझाईन तयार करायला लावली आज सुध्दा येथील खास रेशमपासून तयार केलेली महेश्वरी साडी संपूर्ण भारतात प्रसिध्द आहे.
त्या काळात शेतकरी यांच्यावर लागणारे कर कमी करण्यासाठी सुध्दा राणी अहिल्याबाई होळकर मोठ्या उदार राहिल्या. याच कारणामुळे त्यांच्या शासन काळात मराठा-मालव राज्याने मोठ्या प्रमाणावर यश मिळवले. होळकर परीवाराने राज्याचे उत्पन्न कधीही आपल्या परीवारासाठी वापरले नाही हेदेखील विशेष ! स्वत:च्या खाजगी संपत्तीतुन त्यांनी आपल्या परीवाराचा खर्च भागविला. जाणकारांच्या माहितीनुसार, त्या काळात महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याकडे स्वतःची 16 करोड रुपयांची संपत्ती होती यातूनच त्यांनी देशभरात मंदिरे आणि घाट, धर्मशाळा बांधल्या. महेश्वरात आजही पुरातन भगवान शिवाचे मंदिर आहे.
येथे धार्मिक स्थळ तसेच पर्यटन क्षेत्र असल्याने मध्यप्रदेशासह राज्या-परराज्यातून येथे भाविक व पर्यटक येतात. महेश्वर सशक्त वीर मराठा अहिल्याबाई होळकरांच्या नावाने प्रसिध्द आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा