Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

शिरपूर तालुक्यातील बोरपाणी येथे ५२ हजार रुपये किमतीचा २६ किलो वजनाचे गांजा झाडे जप्त,आरोपी फरार



शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यातील बोरपाणी येथे तालुका पोलिसांनी गांजाची शेती उद्धवस्त करीत ५२ हजार रुपये किमतीचा २६ किलो वजनाचे गांजाची झाडे जप्त केली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तालुक्यातील बोरपाणी गांवाचे शिवारात संभा वालजी पवार यांच्या शेतात यांच्या शेतावर दि.१४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता छापा टाकला. 

सदर शेतात इतर पिकाच्या आडोश्याला अवैध रित्या गांजा या अंमली पदार्थाची वनस्पतींचे विक्रीच्या उददेशाने वाढवली असल्याचे आढळुन आले सदर कार्यवाहीत साडे ५२ हजार रुपये किमतीचा २६ किलो वजनाचे ४ ते ८ फूट उंच वाढलेले गांजा वनस्पतीचे झाडे जप्त केली असून आरोपी शेतमालक संभा वालजी पावरा हा पोलीस रेड पाहून घटनास्थळा वरून फरार झाला त्याच्या विरुध्द शिरपुर तालुका पो.स्टेचे पो.कॉ. संदीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पीएसआय दीपक वारे हे करीत आहेत.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव,उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर अनिल माने यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अभिषेक पाटील, पो.स.ईनरेंद्र खैरनार पोसई दिपक वारे तसेंच जिल्हा पोलीस कार्यालयातील पोलीस कर्मचारी व सांगावी पोलीस कर्मचारी यांनी केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध