Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

तीनशे रुपयाची लाच घेताना महिला कॉन्स्टेबल, लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात...


उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि.5 भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या एका तरुणास कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागणाऱ्या उस्मानाबाद पोलीस मुख्यालयातील ज़िल्हा विशेष शाखेतील महिला पोलीस कॉन्स्टेबल रत्नामाला बजरंग क्षीरसागर हिला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले.

सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार तरुण हे आर्मी मध्ये भरती झाले असून त्यास आर्मी मध्ये जॉईन होण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र ( कॅरेक्टर सर्टिफिकेट )आवश्यक होते. तक्रारदार याना चरित्र प्रमाणपत्र देण्यासाठी महिला पोलीस अंमलदार रत्नामाला बजरंग क्षीरसागर, नेमणूक ज़िल्हा विशेष शाखा उस्मानाबाद यांनी 300 रुपये लाचेची मागणी केली परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे तक्रार केली.

त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून महिला पोलीस अंमलदार रत्नामाला बजरंग क्षीरसागर, नेमणूक ज़िल्हा विशेष शाखा उस्मानाबाद यांनी 300 रुपये लाचेची मागणी करून पंचांसमक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले.याबाबत आनंद नगर, पो स्टे येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी.उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पो.ह. इफ्तेकर शेख, ,पो. ना. मधुकर जाधव पो. शि. विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य व चालक करडे यांनी मदत केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध