Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २२ डिसेंबर, २०२०
तुळजापूर येथील अध्यापक विद्यालय योग्य खबरदारी घेऊन झाले सुरू...
तुळजापूर (राहूल शिंदे)दि.21 येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे
श्री तुळजाभवानी ज्यु. काॅलेज ऑफ एज्युकेशन डी.एल.एड प्रथम वर्ष प्रवेशा संदर्भात शिक्षक-पालक-विद्यार्थी बैठक संपन्न झाली.सदर बैठकीत आवश्यक त्या सूचना,नियमावली व घ्यावयाची काळजी पालकांना व विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.
पालकांचे व विद्यार्थ्यांचे संमतीपत्र घेवून वर्ग अध्यापन सुरू करण्या संदर्भात कोविड19 सर्व नियम पाळून विद्यार्थी पालक बैठक आयोजित करण्यात आली .खडू फळा व वर्ग अध्यापन याशिवाय इतर अध्यापन पध्दती, उपक्रम व कार्यक्रम आयोजनातून विद्यार्थी अनुभव विश्व वाढवण्याचा विदयालय सातत्याने प्रयत्न करीत आहे.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा.कोरे विवेक, प्रास्ताविक प्रा.ओहोळ महेश्वर यांनी केले, पालकप्रतिनिधी म्हणून तुळजापूर व्यापारी संघटना चे कार्याध्यक्ष भालेकर व लोंढे यांनी मनोगतं मांडली. LCD च्या आधारे PPT च्या आधारे मागील वर्षी च्या उपक्रम व शाखा व संस्था परिचय प्रा.विवेक कोरे यानी केला व अध्यक्षीय समारोप प्राचार्य दोंडशशिकांत व आभार प्रदर्शन प्रा.झालटे उल्हास यांनी केले.
जिल्ह्यातील एक आदर्श व उपक्रमशिल शासकीय अध्यापक विद्यालय म्हणून विद्यालयाचा नावलौकिक आहे. विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी यशस्वी होऊन शासकीय सेवेत कार्यरत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा