Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

विरोधी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून राजकीय संघटन वाढविले.हे गुन्हे करण्याचे राजकारण गिरीश महाजन यांनीच शिकवले.



माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत केला आरोप....

जामनेर(प्रतिनिधी) रविवार (२०) रोजी सायंकाळी पारस ललवाणी यांच्या निवासस्थानी पत्रकार परीषद घेतली असता यापत्रपरीषदे मधेही त्यांनी पंधरा दिवसांपुर्वी घेतलेल्या पत्रकार परीषदेतील मुद्यानाच पुन्हा उजाळा दिला हे विशेष,फक्त ७०० वर कोटींच्या ठेवी असतील तर या लोकांनी बिएचआरच्या माध्यमातुन आज रोजी सुमारे १ हजार कोटींची कमाई केली असल्याचाही गौप्यस्फोट केला.माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजनांसह इतर अनेकांनी बिएचआरच्या मालमत्ता अत्यंत कवडीमोल भावात घेऊन ठेवीदारांचे नुकसान केले,त्यामुळे आजही लाखो गोर-गरीब ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळाली नाही,अशा सर्व बिएचआरच्या ठेवीदारांनी आपल्याला साथ दिल्यास त्यांच्या थेट घरावर थालीनांद करून भव्य मोर्चा काढणार असल्याचा ईशारा गिरीश महाजनांसह ईतरांना माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी पत्रकार परीषदेत   केला,अधीकारी वर्गाला हाताशी धरून दबाव आणुन माझ्यासह सहकार्यांवर खोटे-नाटे गुन्हे  दाखल केले, आमदार महाजनांचा जामनेर शिक्षण संस्थेच्या मालमत्तावरही आधीपासुनच डोळा आहे. म्हणून आमच्या संचालकाने त्यांच्याकडे येण्याचे नाही सांगितले की लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल असा प्रकार चालू होता.

तसेच शासनाच्या विवीध प्रकारच्या अधीकृत परवानग्या न घेता बिओटी मार्केट मधील गाळे अव्वाच्या सव्वा भावात विक्री करून सुमारे २०० कोटी रूपये काही बिल्डरांना हाताशी घेऊन कमवीले,शेतकी संघाच्या व्यापारी गाळ्यांबाबतही हेच सुरु आहे.दहा वर्षापुर्वीचे गुन्हे आमच्यावर दाखल केले, मग तुमच्यावर ३ वर्षानंतर गुन्हा दाखल झाला तर यात गैर काय.
तसेच तत्कालीन पोलीस निरीक्षक यांचा वापर करून गुन्हे व तडजोड करून घेण्याची धमकी देत असत असेही ते म्हणाले. पळसखेडा जवळही त्यांनी आत्ता मालमत्ता खरेदी केली,एवढा पैसा त्यांच्याजवळ आला कोठुन याचाही शोध घेणे गरजेचे आहे.

मी लवकरच वरील या सर्व गैरव्यवहार प्रकरणासंबंधातील कागदपत्रांची जुळवा-जुळव झाल्यावर न्यायालयातही जाणार असल्याचे ललवाणी यांनी सांगीतले.यावेळी शेवटी-शेवटी ललवाणी यांनी त्यांच्या जवळील एक सिडी व पेन ड्राईव्ह पत्रकारांना दाखवीला,मात्र त्यात काय आहे यावीषयी ते काहीच सांगु शकले नाही."हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे" असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध