Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

विश्वजन आरोग्य सेवा समितीचे महा रक्तदान शिबिर संपन्न...



परंडा (राहूल शिंदे)दि.15 तालुक्यातील देवगाव(बु)येथे आज विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भासत आहे. म्हणून विविध संस्था, प्रतिष्ठानांनी रक्तदान शिबिर आयोजित करा असे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केले होते म्हणून, विश्वजन आरोग्य सेवा समितीच्यावतीने, वर्धापनदिना निमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन विश्वजन आरोग्यसेवा समितीच्या संस्थापक अध्यक्षा सौ.छायाताई भगत यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम राजमाता जिजाऊं,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशासक संतोष देवकर, ग्रामसेवक दिपक नाईकनवरे, यांच्या हस्ते करून रक्तदान शिबिरास सुरुवात झाली.

 विश्व मराठा संघ व विश्वजन आरोग्यसेवा समितीच्या नियोजनाखाली...... रक्तदात्यांनी रक्तदान केले. या महारक्तदान शिबिराला युवक वर्गांनी विश्वजन आरोग्य समितीला व विश्व मराठा संघाला भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे परिसरामध्ये  समितीचे व मराठा संघाचे कौतुक होत आहे विशेष म्हणजे ह्या महारक्तदान शिबिरा मधुन जे रक्त संकलन केले आहे ते आपल्या राज्यातील गरीब रुग्णांना फक्त प्रोसेसिंग फी घेवून  जे कि स्वतःची एक दिवासाची उपजिविका भागवु शकत नाही अशा गोर गरीब लोकांना हे रक्त मोफत देण्याचे आश्वासन विश्वजन आरोग्य समितीचे जिल्हा समन्वयक तथा विश्व मराठा संघ जिल्हाध्यक्ष सोमनाथ कोकाटे यांनी यावेळी दिले व ते म्हणाले की यापुढे प्रत्येक गावोगावी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा आमचा मानस आहे.

यावेळी रावसाहेब काळे विश्व मराठा संघ परंडा तालुकाध्यक्ष, परंडा तालुका आरोग्यदुत राहुल शिंदे,परंडा तालुका आरोग्य समन्वयक तानाजी कासारे, पोलीस पाटील रविंद्र तांबे,गोविंद बोंद्रे, विकास हगारे, तानाजी कासारे, अनिल अत्रे, अक्षय काटे, अभिजित राजेभोसले, दत्तात्रय ठाकरे,योगेश रणखांब,सुरेश ठाकरे, पांडुरंग ठाकरे, सोमनाथ रणखांब,अनिल चव्हाण,धनंजय रंदवे, रेवण आरे,संतोष ठाकरे, ज्ञानेश्वर ठाकरे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध