Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

सौ.कविता ताई कोळी यांचा दौंड,जिल्हा पुणे येथे कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्काराने सन्मान



धुळे प्रतिनिधी येथील समाज सेवीका,
आदिवासी वाल्मिकलव्य सेना प्रदेश अध्यक्षा, पैलवान गृप कुस्ती प्रेमी महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख ,दादा साहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म इंडस्ट्रीज कंपनी मेंबर्स ..यांना दौंड जि पुणे येथे कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा सदाशिव रणदिवे, प्रदेश उपाध्यक्ष मा सुभाष भोसले सर यांच्या द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दि २० डिसेंबर रोजी दौंड येथील अष्टविनायक सभागृह येथे करण्यात आले होते.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन मा आमदार रमेश आप्पा थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक सेल पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल भाई खान,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सचिन कुलथे,पोलिस उपनिरीक्षक सचिन पाकले साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तसेच सदरील पुरस्कार हा महाराष्ट्रातील ५१ उत्कृष्ट सामाजसेवकांना मिळाला आहे.त्यात आपल्या धुळ्याच्या सौ कविता ताई कोळी यांना कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध