Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ डिसेंबर, २०२०
शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात गणित दिन साजरा...
घनसावंगी (किशोर शिंदे) दि.22 तालुक्यातील मूर्ती येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय 'गणित दिन' म्हणून साजरी करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेव सोळंके हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणुन शहादेव नाडे हे उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेच पुजन करण्यात आले.तसेच गणित दिना निमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली, विद्यार्थी मनोगत घेण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जिवन कार्याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूञसंचलन शिवहारी कायंदे यांनी केले तर आभार सुनिल खरात यांनी मानले.यावेळी विद्यार्थी व शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा