Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ डिसेंबर, २०२०
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद..!शुभ विवाहात होणार आता रक्तदान..!
शिंदखेडा:प्रतिनिधी:दि.१६प्रतिनिधी कोरोना चे संकट लक्षात घेता वधुपित्याने आता विवाहास येणाऱ्या नातेवाईकांसोबतच पंचक्रोशीतील नागरीकांना मुलीच्या विवाहाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदानाची विनंती करीत समाजाला नवीन संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत माहिती अशी की ,शिंदखेडा तालुक्यातील सार्वे येथील श्री तुषार आत्माराम पाटील यांची सुकन्या स्वाती हिचा विवाह शिरपूर येथील श्री दशरथ काशीराम पाटील यांचा चिरंजीव दर्शन यांच्याशी १९ डिसेंबरला दुपारी संपन्न होत आहे.
या विवाह समारंभांतून वधू व वर पित्याने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून शुभ विवाहानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.आपल्या सग्या सोयऱ्यांनसोबतच परिसरातील युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन भामरे परिवारातर्फे करण्यात आले आहे.विवाहास येणाऱ्या प्रत्येकास मास्क आणि सॅनिटायझर पुरवण्यासोबतच सोशल डिस्टन्स अटींचे पालन व्हावे यासाठी काळजी घेतली जात आहे .नुकताच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनांना विवाहसमारंभातून प्रतिसाद देण्यासाठी आपण हा उपक्रम राबवित असल्याचे परिवाराचे म्हणणे आहे.
तरी सार्वे ता. शिंदखेडा येथे १९ डिसेंबर राेजी होणार्या रक्तदान शिबिरात युवकांनी अधिकाधिक रक्तदान करावेअसे आवाहन दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.शरद पंडितराव पाटील तसेच सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा