Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १६ डिसेंबर, २०२०
बिबट्या जेर बंद करण्यात अखेर वनविभागाला मिळाले यश..!
चोपडा तालुक्यातील भार्डू व हातेड गावाच्या परिसरात बिबट्या दिसुन आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.बिबट्या दिसुन आल्याने नागरिकांनी वनविभागाला कळवले व वनकर्मचारी यांना माहिती मिळताच घटना स्थळी धाव घेतली.
व दुपारी 2 वाजेपासुन शोध घेत बिबट्या अखेर रात्री 11:30 वाजता वनविभागाच्या कर्मचारी यांना बिबट्याला जेर बंद करण्यात यश मिळाले.
बिबट्याने काहीतरी सेवन केले असेल अथवा तो कदाचीत आजारी असू शकतो.त्यामुळे तो एकाच जागी बसून होता.भार्डू आणि लहान हातेड परिसरातील नागरिकांच्या मदतीने वन विभागाच्या पथकाने त्याला जाळ्यात घेतले.
बिबट्या ताब्यात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
याकामी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी व्ही.एच.पवार,चोपडा वनक्षेत्रपाल दत्तात्रय लोंढे,सत्रासेन आणि लासुर येथील वन कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.दिवसेंदिवस जंगल परिसर कमी होत असून वन्य प्राण्यांना अन्न पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जंगलातील प्राणी नागरी वस्तीकडे वाटचाल करु लागले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषय...
-
नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा